बंजारा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय
चाळीसगाव : बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या राष्ट्रीय संघटक या महत्त्वपूर्ण पदावर डॉ. तुषार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
![]() |
| बंजारा समाजाचे महंत प.पू. जितेंद्र महाराज व गोर बंजारा समाजाचे बारा धाम निर्माते मा. किसनभाऊ राठोड यांच्या सोबत डॉ. तुषार राठोड |
डॉ. तुषार राठोड हे बंजारा समाजातील अभ्यासू कार्यकर्ते व समाजहितासाठी सातत्याने काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. समाजातील युवकांना संघटित करणे, शिक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवणे यामध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची राष्ट्रीय संघटक (भारत) या पदावर निवड जाहीर केली आहे. त्यांच्या निवडीमुळे बंजारा समाजातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. तुषार राठोड यांच्या निवडीबद्दल बंजारा समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांनी भविष्यातही समाजाच्या विकासासाठी अधिक प्रभावी कार्य करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Tags
चाळीसगाव

