सरपंच दिलीप पटाईत, उपसरपंच तकतसिंग पवार, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार सतिष एस राठोड यांचा सत्कार
पिंप्री खुर्द (परशुराम नगर) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पिंप्री खुर्द, परशुराम नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच त्यानिमित्ताने ग्रामपंचायत पिंप्री खुर्दचे सरपंच दिलीप पटाईत, उपसरपंच तकतसिंग पवार, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार सतिष एस राठोड यांचा सत्कार देखील करण्यात आला.
पत्रकार राठोड हे सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असून गरजू व गरीब सामान्य जनतेसाठी विविध पातळीवर मदत उपलब्ध करून त्यांना न्याय मिळवून दिलेले आहेत. पत्रकारिता, कामगार चळवळ, सामाजिक कार्य अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय आहे. तसेच १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त व महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रभक्ती जनविकास संघटना, भारत यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा " राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार " पत्रकार सतिष एस राठोड यांना प्रदान करण्यात आला आहे, ही बाब पिंप्री खुर्द येथील ग्रामस्थांसाठी अभिमानाची असल्यामुळे त्यांचा सत्कार व सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



