कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते सांभाळत आहेत प्रचाराची धुरा


महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे हजारो कार्यकर्ते कर्नाटकात दाखल

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने नखशिखांत जोर लावलेला आहे. पक्षाने दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या आपल्या नेत्यांना निवडणूक प्रचारामध्ये उतरविले आहे.  केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार मुंबईसह महाराष्ट्रातील ६० पेक्षाही जास्त नेते व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रचाराची धुरा चोख सांभाळत आहेत. पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा' आणि हिमाचल प्रदेश मधील सत्तांतरानंतर काँग्रेस पक्षाचा उत्साह आणखी वाढला आहे.

काँग्रेस पक्षाने आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता स्थापन करण्याची एक प्रकारे जनप्रतिज्ञाच घेतली आहे. काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशावरून महासचिव श्री के सी वेणूगोपाल यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार संजय निरुपम यांच्यासह माजी मंत्री श्री अमित देशमुख, माजी मंत्री श्री विजय पाटील, माजी मंत्री श्री सतेज पाटील, श्री सुनील देशमुख ल, श्री चरणसिंह सप्रा, श्री मुजफ्फरजी हुसेन, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आमदार श्री राजेश राठोड, श्री ऋतूराज पाटील, श्री संग्राम धोपटे, माजी खासदार सुरेश तायडे, श्री विकास ठाकरे, श्री विश्वजीत कदम, श्री निशांत सिद्दिकी यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध 50 ते 60 पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी पाठवले आहे. ज्यामध्ये माजी खासदार श्री हुसेन दलवाई, ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रांत पाटील, ठाणे ग्रामीण अध्यक्ष श्री दयानंद चोरगे हे देखील सहभागी आहेत. सर्व नेते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचारामध्ये जीवाचे रान करीत आहेत.

गुलबर्गा जिल्ह्यामधील विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचाराची जबाबदारी पार पाडणारे महाराष्ट्र विधान परिषद मधील काँग्रेस पक्षाचे प्रतोद माननीय आमदार श्री राजेश राठोड यांनी सांगितले आहे की, 

"कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य उमेदवार तसेच गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली, चितापूर, गुलबर्गा ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उमेदवार अनुक्रमे श्री सुभाष राठोड, श्री प्रियांक खर्गे आणि रेवू नाईक हे उमेदवार अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. गुलबर्गा आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या बंजारा बहुल जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे हजारो कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचा हिरीरीने प्रचार करीत आहेत !"

आ. राजेश राठोड यांच्या जोडीला श्री राजू पवार, 'वसंत-विचारधारा मंच' चे समन्वयक श्री राजेश श्रीराम चव्हाण जालनेकर, कोषाध्यक्ष श्री रितेश पवार, सदस्य श्री गोविंद राठोड, श्री मन्नूर राठोड, श्री नितिन राठोड सह अनेक कार्यकर्ते प्रचारात झटत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post