मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान
शिबीर (सरकार आपल्या दारी) उपक्रमांतर्गत महिलांसाठीच्या शासकीय योजनांची
माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल
प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. यावेळी मुख्य
सचिव मनु कुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
हे फिरते वाहन ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत
‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू असलेल्या महापालिका वॉर्डमध्ये फिरणार
असून, या वाहनावरच्या एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय
योजनांची माहिती देण्यात येणार आहे.