समाज सेविका मा. अलंक्रीतताई राठोड यांचा मे महिन्यात पुसद तालुका दौरा.


यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका हा स्व.वसंतरावजी नाईक साहेबांचा वारसा लाभलेला तालुका आहे. या तालुक्यात जागतिक स्तरावर किर्ती निर्माण करणारे व्यक्तिमत्व उदयास आले आहेत, तसेच यशस्वी उद्योजिका मा. अलंक्रीतताई किसनराव राठोड यांचे नाव याच व्यक्तिमत्वामध्ये समाविष्ट होते. मुंबई सारख्या शहरात मोठमोठ्या कंपन्यांची सीएमडी (CMD) पद आज अलंक्रीतताई सांभाळत आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध ऊद्योगपती मा.श्री.किसनराव राठोड यांच्या त्या धर्मपत्नी व मा. किसनराव राठोड यांचा जो समाजसेवेचा वारसा आहे. त्याच्यांच पावलांवर पाऊल ठेवत मा. अलंक्रीतताई समाजसेवा करतांना दिसून येतात. हजारो युवक युवतींना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिलेले आहेत, तसेच गरजू, गरीब व होतकरू विध्यार्थांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी, त्यांचे सहकार्य सतत मिळत राहते. तसेच आता त्यांचा पुढील संकल्प यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत निर्माण करणे आहे. व तेथील मजूर, ऊसतोड कामगार व इतर कामगार  वर्ग यांना अन्य ठिकाणी कुठे न जाता स्थानिक पातळीवर उद्योग निर्माण करून  त्यांना काम उपलब्ध करण्याचा मानस आहे.

समाज सेविका तसेच महिला उद्योजक अलंक्रीतताई राठोड यांचा येणाऱ्या 16 मे ला पुसद तालुक्यात एक दौरा होणार आहे. व त्यानिमित्ताने गहुली येथे स्व. वासंतरावजी नाईक साहेबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन तसेच पुढे पुसद तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून व पुसद येथेमा. नाईक साहेब साहेब यांची भेट घेणार आहेत. तसेच पुढे सावरगाव गोरे येथील त्यांच्या माहेरच्या मंडळींची भेट घेणार आहेत.


या दौऱ्यात पुसदकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पसिद्धी प्रमुख किसन जाधव राष्ट्रीय बंजारा परिषद यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post