आरक्षणातील घुसकोरी थांबविण्यासाठी शासकीय विश्रामगृह ठाणे येथे सामाजिक बैठक संपन्न

आरक्षणातील घुसकोरी थांबविण्यासाठी शासकीय विश्रामगृह ठाणे येथे सामाजिक बैठक संपन्न

ठाणे : महाराष्ट्रामध्ये जिल्हा जात पडताळणी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढला असून काही दलाल अधिकाऱ्यांशी संगनमत करुन हवे ते दाखले पदरात पाडून घेत आहेत. विमुक्त जाती प्रवर्गातील जातींच्या नावाचे दाखले घेत घुसखोरी केलेली आहे. मूळ विमुक्त जातीत मोडत नसलेले आणि विमुक्त जातीत असल्याचे खोटे पुरावे सादर करुन या जातींच्या नावाचा गैरफायदा घेत हजारोंच्या संख्येने शासकीय नोकऱ्या बळकावल्या आहेत व लाखोंच्या संख्येने खोट्या जात पडताळणीचे दाखले प्राप्त केलेले आहेत. तसेच समितीने दिलेल्या अधिकारांचा काही अधिकाऱ्यांकडून दुरुपयोग सुरू असून मनमानी कारभार चालू आहे. महाराष्ट्रात विमुक्त आणि भटक्या जातींतील बांधवांची संख्या मोठी आहे. व ज्या जातीच्या नावाने घुसखोरी केली जात आहे, त्या जातींची लोकसंख्या साधारणतः ३५ हजारच्या आसपास आहे, तरी सुद्धा लाखोंच्या संख्येने खोटे जात प्रमाणपत्र प्राप्त केले जात आहे. यावरून असे दिसते की दलाल व अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटे दाखले दिले जात आहेत. तसेच बोगस जात पडताळणी दाखला देणाऱ्या  अधिकाऱ्यांवर कारवाई व्हाही यासाठी आज ठाणे विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकी दरम्यान मान्यवरांनी आपआपले विचार व्यक्त केले असून लवकरच संबंधित अधिकारी व खोटे दाखले घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रणनिती आखली गेली आहे.

या बैठकीत डॉ. टी. सी. राठोड (संस्थापक - NSDA) डॉ गणेश राठोड (प्रदेशाध्यक्ष - NSDA), प्रा. मोहन चव्हाण (राष्ट्रीय अध्यक्ष - भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था), मिलिंद पवार वास्तुविशारद (नवी मुंबई), मंगल चव्हाण (विकासक, ठाणे), राजपाल राठोड (प्रदेशाध्यक्ष - AIBSS ), डॉ. राम चव्हाण (मुंबई अध्यक्ष - NSDA ), अनिल राठोड (प्रदेश सचिव भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था), डॉ. सुभाष राठोड अकोला, राजेश राठोड (प्रदेश अध्यक्ष - ऑल इंडिया बंजारा सेना) बुलढाणा, अभय चव्हाण,  जगदीश राठोड, NSDA, व्यंकटेश राठोड, (प्रदेश अध्यक्ष - BBSKSS) जगनभाऊ  राठोड (कार्याध्यक्ष - BBSKSS), सुरेश पवार (कोषाध्यक्ष - BBSKSS), सुभाष तंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीचे उत्कृष्ट असे नियोजन भास्कर राठोड, BBSKSS व सुरेश राठोड यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post