हे गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्त्यापासून वंचित, बंजारा ब्रिगेडने छेडले रास्ता रोको आंदोलन

हे गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्त्यापासून वंचित, बंजारा ब्रिगेडने छेडले रास्ता रोको आंदोलन
  • गरोदर मातांना किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
  • प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष.
  • भडगाव तालुक्यातील वलवाडी ते टिटवी गावाला हवाय पक्का रस्ता. 
  • स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ग्रामस्थांचा चिखल तुडवत प्रवास.

भडगाव : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद शासनाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. पण राज्यातील अनेक गाव, वस्ती, पाडा असे आहेत की, तिथला विकासच झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात वलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले वलवाडी ते टिटवी रोडचे काम गेल्या 75 वर्षांपासून करण्यात आलेले नाहीत. ग्रामस्थांकडून वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनं चिखलातून घेऊन जाणे म्हणजे मोठे दिव्य पार करण्यासारखे आहे. दुचाकी धारकांना धोका पत्करून पाणी, खड्डे, चिखलातून वाट काढून जावे लागते. अनेक वेळा येथील गरोदर मातांना किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

हे गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्त्यापासून वंचित, बंजारा ब्रिगेडने छेडले रास्ता रोको आंदोलन

त्यामुळे शेवटी बंजारा ब्रिगेड संघटनेच्या वतीने 17 एप्रिल रोजी शासनाला निवेदनाचे पत्र देण्यात आले. निवेदनात 1 ते दीड किलो मीटरच्या रस्त्याचे काम गेल्या 75 वर्षापासून झालेला नसून प्रशासनाने तात्काळ हा विषय गंभीरतेने समजून संघटनेने व ग्रामस्थांनी केलेल्या रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण करुन न्याय द्यावे, अन्यथा 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. परंतु संबंधित प्रशासनाने निवेदनाची दखल घेतल्या नसल्या कारणाने 1 मे रोजी बंजारा ब्रिगेड व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

सध्या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत, मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी घेऊन आंदोलकांची भेट घेतली. तसेच ग्रामस्थांनी केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेत.

तसेच पुढील एका महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास या पेक्षा तीव्र रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा बंजारा ब्रिगेडचे खान्देश विभागीय अध्यक्ष राहुल राठोड, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद पवार, उपविभागीय संघटक प्रज्वल चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष योगेश जाधव, यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी पाचोरा तालुकाध्यक्ष श्रीराम राठोड, समाधान पवार लक्ष्मण जाधव, गोविंद पवार, सुदाम पवार, प्रकाश पवार, शामराव पवार, भागवत पवार विश्वास पवार, देशमुख पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post