उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण

जालना : पोलीस आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जालना पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती  व पोलीस महासंचालक, मुंबई यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या 14 चारचाकी आणि 20 मोटारसायकल वाहनांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

जालना येथील रेल्वे स्थानक परिसरात आयोजित या कार्यक्रमास  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post