कल्याण : आंबिवली (अटाळी) परिसरातील हजारो भाविकांचे श्रध्दा स्थान असणाऱ्या श्री दत्त देवस्थान (मठ) येथे सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा उत्सव भक्ती भावाने साजरा करण्यात आला.
तसेच सालाबादप्रमाणे कल्याण परिसरातील रिक्षाचालक बंजारा समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद तसेच भोजनाचा आस्वाद परिसरातील भाविकांनी घेतले. समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली असून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Tags
ठाणे