मुंबई : बुधवार दिनांक २६ जून, २०२४ रोजी सकाळी ०६.४५ वाजताच्या दरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुल बस जे जे उड्डाणपुलाच्या बाजूच्या भिंतिस धडकली. त्यानंतर या शाळेच्या बसचा तोल जाऊन सदर बस डिव्हाईडर ओलांडून रस्त्याच्य दुस-या बाजूस गेली. या अपघातादरम्यान शाळेच्या बसमध्ये एकूण २१ विद्यार्थी, महिला बस अटेंडन्ट, व क्लिनर होते.
सुदैवाने यावेळेस बेस्ट उपक्रमाचे तात्पुरते विद्युत जोडणी वाहन घटनास्थळी सदर बसच्या मागे होती बेस्ट उपक्रमाचे कामगार घटनास्थळी आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम सदर बसचा क्लिनर व एक मुलगा बसच्या बाहेर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळले. त्यानंतर त्यांनी त्यांना तात्काळ उपक्रमाच्या एका कामगारांने खाजगी वाहन थांबवून त्या वाहनातून जीटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या इतर मुलांनादेखील सदर बसच्या बाहेर काढून ज्या मुलांना गंभीर दुखापत झालेली आहे अशा मुलांना वेगवेगळया हॉस्पीटमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. अशाप्रकारे बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने या शाळकरी मुलांचा जीव वाचविण्यास तसेच त्यांना योग्य वेळी उपचार मिळण्यास मदत झाली.
याप्रसंगी बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी केलेले कार्य हे प्रशंसनीय असून व माणूसकिच्या दृष्टीकोनातून देखील गौरवास्पद आहे. सदर घटनास्थळी मदतीसाठी धावून आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
उपरोक्त कामगारांचा दिनांक २७ जून, २०२४ रोजी बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगार येथील मुख्यालयात श्री बिलाल शेख, सहायक महाव्यवस्थापक (विद्युत पुरवठा) यांच्या हस्ते सत्कार करुन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी बेस्ट उपक्रमाचे अधिकारी श्री नेताजी चौगुले, मुख्य अभियंता परिरक्षण व कार्य, श्री. सुरेश मकवाना, मुख्य अभियंता नियोजन व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (ज.स.अ.) श्री सुनिल वैद्य, देखील उपस्थित होते.