“जिथे कमी, तिथे आम्ही…” असं माणसानं वागावं व जगावं, ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी आपणच पुढाकार घेऊन गरजूंना मदत करावी, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या प्रमाणे आपण भावना ठेवली पाहिजे व दिलखुलासपणे गरजूंना शक्य तेवढी मदत करायला पाहिजे...
आपण आपल्या वाढदिवासाच्या निमित्ताने आपणही हा संकल्प राबवावा. - सतिष एस राठोड, पत्रकार
कल्याण :- आपला वाढदिवस आप्तस्वकीयांसोबत सेलिब्रेट करणारे अनेक नजरेस पडतात. मात्र गरीब गरजू बेघर आणि रस्त्यांवरील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करणारे क्वचितच. पण पत्रकार सतिष राठोड यांनी आदिवासी वस्तीत राहणाऱ्या परिवारांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे.
वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत वाढदिवस सगळेच साजरा करताना दिसतात. काही लोक या दिवशी धार्मिक अनुष्ठान तर काहीजण आपले मित्र आणि नातेवाईकांसोबत मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करतात. मात्र वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून सतिष राठोड यांनी आपला वाढदिवस १२ डिसेंबर रोजी आदिवासी मुलांबरोबर नुकताच साजरा केलेला आहे. राठोड यांनी आपला वाढदिवस हा स्वतःच्या घरी किंवा मित्र परिवारामध्ये थाटा- माटात साजरा न करता हा वाढदिवस त्यांनी कल्याण येथील कातकरी आदिवासी वस्ती येथे जाऊन आदिवासी परिवारांसोबत केक कापून जेवणाचा आस्वाद घेतला व आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी वस्तीत राहणाऱ्या परिवारांना पोटभर जेवण देऊन त्यांनी हा वाढदिवस साजरा केला आहे.
राठोड त्यावेळी बोलतांना म्हणाले की येणाऱ्या काळातील आनंदाचे उत्सव आदिवासी तसेच निराधार बालकांसोबत त्यांच्यात साजरे करु. तसेच त्याठिकाणी कातकरी आदिवासी बांधव राहत असल्याची माहिती सुनील श्रीवास्तव साहेब यांनी आम्हाला दिली. व नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्याबद्दल श्रीवास्तव साहेबांचे आभार मानतो. अश्याप्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये आवड आहे असे ते म्हणाले.
आपल्या वाढदिवसानिमित्त राठोड यांनी इतरत्र कुठलाही खर्च न करता त्यांनी हा उपक्रम केला. या उपक्रमात येथील समाज सेवक कैलास तंवर, महेंद्र तिवारी, सुनील श्रीवास्तव, करुणाशंकर मिश्रा, उदयराज तिवारी, अजित सिंग, संभाजी जाधव, गोकुळ पवार, सुभाष चव्हाण, अनिल राठोड, अरुण तंवर, संजय राठोड, ओम जाधव, ज्ञानेश्वर पवार, प्रविण पवार, राहुल पवार उपस्थित होते.
वाढदिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा.
👇🏻


