कल्याण येथे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन; शताब्दी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कल्याण येथे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन; शताब्दी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कल्याण | प्रतिनिधी (अशोकराव चव्हाण) : मुंबई येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) अभ्यासक्रमाच्या जून २०२६ नियमित व हॉलिडे बॅचच्या वर्गाचे उद्घाटन सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त (घनकचरा व पर्यावरण विभाग) मा. रामदासजी कोकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबिराला विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात २२ विद्यार्थी व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव जपली. हा कार्यक्रम कल्याण (पूर्व) येथील महापालिका वॉर्ड क्र. ४-जे विभागीय कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आला होता.

कल्याण येथे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन; शताब्दी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सेवेमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा देत समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, परिसरातील नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कल्याण येथे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन; शताब्दी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

यावेळी कल्याण विभागीय संचालक मा. मारुती खोडके, मा. विनीत सर, मा. गुप्ता मॅडम, मा. अनिल जाधव, पाटील साहेब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या महारक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (पश्चिम) येथील अर्पण रक्तपेढी यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमाने शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचा सुंदर संगम घडवून आणला.

कल्याण येथे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वर्गाचे उद्घाटन; शताब्दी वर्षानिमित्त महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Post a Comment

Previous Post Next Post