![]() |
| "वीज ग्राहकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करताना डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अण्णासाहेब काळे साहेब" |
गणपती मंदिराच्या मागे, पी. डी. रोड, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित या मेळाव्यात वीज बिलातील त्रुटी, स्मार्ट मीटरमधील वीज वापर, मीटर रीडिंग, वाढीव बिल, तांत्रिक अडचणी आदी विषयांवर ग्राहकांना संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली.
स्मार्ट मीटरबाबत सविस्तर मार्गदर्शन
मेळाव्यात स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, अचूक वीज मोजणी, पारदर्शक बिलिंग प्रणाली, रिअल-टाइम वीज वापराची माहिती, ऑनलाइन सेवा तसेच वीज बचतीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत ग्राहकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या प्रत्येक शंकेचे संयमाने निरसन करत स्मार्ट मीटरविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला.
आषाढी एकादशीनिमित्त केळी वाटप
मेळाव्याच्या समारोपाच्या दिवशी आषाढी एकादशीनिमित्त उपस्थित वीज ग्राहकांना केळी वाटप करण्यात आले. तक्रार निवारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे ग्राहकांनी स्वागत केले.
ग्राहकाभिमुख सेवेला सकारात्मक प्रतिसाद
महावितरणच्या ग्राहकाभिमुख धोरणाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध सेवा, तत्काळ मार्गदर्शन आणि पारदर्शक माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे आधुनिक वीज सेवांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली.
डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अण्णासाहेब काळे साहेब तसेच देयक व महसूल उपविभाग, डोंबिवली (पश्चिम)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्र.) श्री. सुनिल गौंड साहेब यांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वीज ग्राहकांचे आभार मानले. भविष्यातही अशा ग्राहकाभिमुख उपक्रमांद्वारे अधिक पारदर्शक, जलद आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या पहिल्या दिवशी ५४, दुसऱ्या दिवशी ४९ आणि तिसऱ्या दिवशी ५८ ग्राहकांनी सहभाग नोंदवला. अशाप्रकारे तीन दिवसांत एकूण १६१ ग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.






