पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळांचे संचालन करण्यात येते, या शाळांमध्ये स्मार्ट सिटी तर्फे म्युनिसिपल ई क्लासरूम प्रकल्प राबवला जात आहेत, ज्यात कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स इत्यादींचे प्रशिक्षण विद्यार्थाना दिले जाते. तसेच शाळेतील प्रत्येक वर्गात ६५ इंच चा इंटरॅक्टिव्ह टीव्ही लावण्यात आला असून ज्यातून शिक्षक विद्यार्थाना स्मार्ट पद्धीतीने शिक्षण देत आहेत.
विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातील अभ्यासक्रम अजून सोपा करून शिकवण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने स्मार्टच्या मदतीने शाळांमध्ये बाला प्रकल्प राबिवला असून ज्या अंतर्गत शाळेतील भिंती वर पाठपुस्तकातील अभ्यासक्रम, विज्ञान आणि आणि गणिताच्या संकल्पना भिंतीवर पेंट करून काढण्यात आल्या आहेत, ज्या द्व्यारे येता जाता, खेळतानाही विद्यार्थी ह्या संकल्पना पाहून त्याचा अभ्यास करू शकतील व त्याचे आकलन त्यांना सहज होईल. काही संकल्पना ह्या इंटरॅक्टिव्ह पद्धतीच्या असून ज्यात मुलांनी क्रिया करून त्या सोडवायच्या आहेत, जेणे करून मुलांचा बैद्धिक विकास होण्यास मदत होणार आहे.
अश्या ह्या बोलक्या भिंतींमुळे शाळा अधिकच आकर्षक झाली असून पालक हि शाळेत मुलांना सोडण्यास येतात, तेव्हा सेल्फी घेतात फोटो काढतात अशी प्रतिकिया एका शाळेतील मुख्याध्यापकांनी दिली आहे.
सध्या ४० शाळांमध्ये बाला प्रकल्पांतर्गत पेंटिंगचे काम पूर्ण झाले असून इतर काम शिक्षण विभागाच्या साहाय्याने होणार आहे.