सरकारी शाळांच्या खाजगीकरणाविरोधात महामार्ग रोखला, समनक जनता पार्टी रस्त्यावर

सरकारी शाळांच्या खाजगीकरणाविरोधात महामार्ग रोखला, समनक जनता पार्टी रस्त्यावर


गगनभेदी घोषणा आणि भाषणाने पळशी फाटा, सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर  परिसर दणाणला. 


छत्रपती संभाजीनगर : सरकारी शाळांचे खाजगीकरण आणि सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करा. अशा गगनभेदी घोषणा देत समनक जनता पार्टीने तब्बल अर्धा तास अकोला - पळशी फाटा, सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर  महामार्ग रोखून धरला. 

आज रोजी पळशी फाटा, सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या चारही बाजूंनी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळा ह्या खाजगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 20 पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करुन त्या कॉम्प्लेक्स स्कूल मध्ये विलीन करुन छोट्या गावातील शाळांना कायमचे टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय काढला आहे.


सरकारी शाळांच्या खाजगीकरणाविरोधात महामार्ग रोखला, समनक जनता पार्टी रस्त्यावर

शिक्षण आणि नोकरी हे समस्त नागरिकांच्या प्रगतीचे द्वार आहे.  हे द्वारच बंद करण्याचा षडयंत्रपूर्वक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.  या विरोधात सर्व स्तरातून विरोध होत असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.  अशा परिस्थितीत समनक जनता पार्टीने सर्वप्रथम रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.  दि.  26 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन झाले. प्रदेशाध्यक्ष डॉ.रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या नेतृत्वात राज्यात विविध जिल्ह्यात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.  छञपती संभाजीनगर  येथे जिल्हाध्यक्ष डाॅ. जीवन चव्हाण  यांच्या नेतृत्वात पळशी फाटा सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर  येथे रास्ता रोको करण्यात आला.



सकाळपासूनच पावसाचे वातावरण दिसतांना सुद्धा समनक जनता पार्टी पक्षाचे जिल्ह्याभरातील कार्यकर्ते शहरात दाखल झाले. यावेळी डाॅ. जीवन चव्हाण यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. जय मानवता,  जय संविधान, शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे रद्द करा,  रद्द करा, शाळा बंदीचा कायदा रद्द करा, शिक्षण वाचवा,  देश वाचवा आदी विविध घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. यावेळी अरुण राठोड जिल्हा संयोजक, सुभाष पवार, कैलास राठोड, संतोष राठोड यांनी आक्रमकपणे भाषण करून शासनाच्या तुघलकी निर्णयाचा निषेध व्यक्त केला आणि सदर निर्णय मागे न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करू असा शासनाला इशाराही दिला.  शाळा आणि शिक्षण वाचविण्यासाठी अर्धा तास कार्यकर्ते घोषणा देत होते. आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान सावंगी बायपास छत्रपती संभाजीनगर  महामार्गावर रस्त्याच्या दोन्हीही कडेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.


सरकारी शाळांच्या खाजगीकरणाविरोधात महामार्ग रोखला, समनक जनता पार्टी रस्त्यावर

आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त बजावला. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आणि या आंदोलनात गोरसेनेचे जिल्हा संघटक विलास चव्हाण व संतोष राठोड यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. चिकलठणा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. या राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाला गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभाऊ जाधव यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला असून कार्यकर्ते सुद्धा प्रत्यक्ष मोर्चात सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post