‘सेवारत्न’ पुरस्कारांचे तेजस्वी साक्षीदार ठरले ठाण्यातील ‘रक्तदान – नेत्रदान – ज्ञानदान’ महाउपक्रम

‘सेवारत्न’ पुरस्कारांचे तेजस्वी साक्षीदार ठरले ठाण्यातील ‘रक्तदान – नेत्रदान – ज्ञानदान’ महाउपक्रम

डायसाण फाउंडेशन व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उपक्रमास जाहीर प्रतिसाद

ठाणे : माणुसकीच्या तत्त्वांवर आधारित सामाजिक चळवळीचा भव्य आविष्कार ठाण्यात नुकताच घडून आला. डायसाण फाउंडेशन आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "रक्तदान – नेत्रदान – ज्ञानदान" या भव्य उपक्रमास लोढा सुप्रीमस-II, वागळे इस्टेट येथील IT पार्कमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात एकूण ९४ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपले कर्तव्य पार पाडले, तर १२ जणांनी नेत्रदान आणि अवयवदानासाठी शपथ घेतली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, प्रमुख उद्घाटक मंगेश चिवटे, आणि प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल मोरे, विजय कट्टी, विनय शेट्टी, श्रीपाद आगाशे, सुरेश रेवणकर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात नीतू राठोड आणि नेमू राठोड या विद्यार्थिनींच्या आवाजातील राज्यगीताने झाली.

द्वीपप्रज्वलन आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत यामुळे सोहळ्याला पारंपरिक आणि पर्यावरणाभिमुख आधार मिळाला.

यानंतर डॉ. अतुल तारासिंग राठोड यांनी प्रस्ताविक करत डायसाण फाउंडेशनच्या गेल्या ६ वर्षांच्या सेवाभिमुख प्रवासावर प्रकाश टाकला.

त्यात त्यांनी "एक घर – एक उद्योजक", ‘Green Yeoor, Clean Yeoor’, महिला सशक्तीकरण, आणि तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट अधोरेखित केले.

मंगेश चिवटे सरांनी रक्तदात्यांसाठी सुरू असलेल्या ‘एकनाथ शिंदे सुरक्षा कवच’ योजनेची सविस्तर माहिती दिली, ज्या अंतर्गत प्रत्येक रक्तदात्यास ₹१० लाखांपर्यंत अपघाती विमा सुरक्षा दिली जाते — आणि ही योजना संपूर्ण देशात पहिल्यांदाच सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.

तसेच त्यांनी तरुणांना आवाहन केले की, "३१ डिसेंबरची पार्टी रक्तदान करून साजरी करा – जीवनदान हेच खरे सेलिब्रेशन."

विजय कट्टी सरांनी ‘वेस्ट टू बेस्ट’, औषधी रोपांचे टेरेस गार्डन, आणि शाश्वत पर्यावरणविषयक उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.

श्रीपाद आगाशे, विनय शेट्टी, सुरेश रेवणकर आणि सुनिल मोरे यांनी तरुणांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणारे प्रभावी विचार मांडले.

‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेले मानकरी:

मंगेश चिवटे – उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख,

श्रीपाद आगाशे – नेत्रदान चळवळीत ४० वर्षांचे योगदान,

विनय शेट्टी – LifeBlood Council चे संस्थापक,

सुरेश रेवणकर – १६४ वेळा रक्तदान करून मानवतेचे प्रतीक.

या उपक्रमात सुमारे १०० युनिट रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं.

१,००० हून अधिक आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वह्या, पेन, छत्र्या, चादरी, ब्लँकेट्स, कॉम्पास बॉक्स यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी Hiranandani Midhouse मधील मनीषा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रुपने अत्यंत मनःपूर्वक शालेय साहित्य, कपडे व अन्य उपयुक्त साहित्याचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी लोढा सुप्रीमस-II सोसायटीचे व्यवस्थापक राजेश शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेत उमाशंकर सिंग, कृष्णा सिंग, सुवर्णा चव्हाण, नीतू राठोड, नेमू राठोड, जगदीश गाग व इतर अनेक स्वयंसेवकांचे बहुमूल्य योगदान लाभले.

 ३० जून ते १ ऑगस्ट २०२५ दरम्यान डायसाण फाउंडेशनतर्फे ‘लोकसेवा पर्व’ साजरा करण्यात येणार असून, त्यात शैक्षणिक, आरोग्यविषयक, रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

मानवतेचे खरे मूल्य हीच आपल्या कार्याची प्रेरणा आहे. अशा उपक्रमांद्वारे समाजात नवचैतन्य, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा प्रसार व्हावा, हीच डायसाण फाउंडेशनची आस्था.



Post a Comment

Previous Post Next Post