वाशिंद व शहापूर तालुक्यात डायसाण फाऊंडेशनकडून १०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

ठाणे : ३० जून २०२५ रोजी डायसाण फाऊंडेशन आणि डायसाण गृप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने, वाशिंद पूर्व येथील जिल्हा परिषद शाळा रायकरपाडा तसेच जिल्हा परिषद शाळा शिर्वंझे (पोस्ट खरिवली, ता. शहापूर) येथे १ ली ते ७ वीच्या वर्गातील १०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

डायसाण ग्रुपचा ९ वा वर्धापन दिन आणि Neetu Atul Rathod हिचा १४ वा वाढदिवस या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम, डायसाण फाऊंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या '३० जून ते १ ऑगस्ट - लोकसेवा पर्वा' अंतर्गत राबविण्यात आला. या काळात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक कार्यांची मालिका हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत, काही होतकरू, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा संकल्पही फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे.

रायकरपाडा येथील कार्यक्रमासाठी रवींद्र चांदे (अध्यक्ष, कुणबी महोत्सव प्रतिष्ठान – कोकण विभाग), प्रविण बडे, संजय हट्ट, सुभाष काळसकर, सुनील फर्डे, सुजाण वडके, लक्ष्मण मोरे, तसेच शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिर्वंझे शाळेतील कार्यक्रमात पोलिस पाटील काळूराम फर्डे, मुख्याध्यापक मुरलीधर शिंदे, शिक्षिका पूजा फर्डे, सौ. मेनका शिनारे व इतर ग्रामस्थांचा सहभाग होता.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी Neetu Rathod आणि Nemu Rathod यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी विचार व मार्गदर्शन केले. त्यांनी गाणी सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला.

कार्यक्रमास डॉ. अतुल तारासिंग राठोड यांनी उपस्थित राहून डायसाण फाउंडेशनच्या कार्याचा आढावा दिला. त्यांच्या मार्गदर्शनात वैशाली राठोड, सुवर्णा चव्हाण, कृष्णप्रताप सिंग, अनुप भगत, मनीष सिंग यांची डायसाण फाऊंडेशन टीम कार्यरत होती.

शिक्षण, सेवा आणि समाजप्रेम या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत, डायसाण फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम सामाजिक भान जागवणारा आणि प्रेरणादायी ठरला.


Post a Comment

Previous Post Next Post