दिवा येथे संत सेवालाल गोर बंजारा समितीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

 

ठाणे : दिवा शहरातील श्री संत सेवालाल गोरबंजारा समिती तर्फे ठाणे महापालिकेचे निवडून आलेले दिव्यातील सर्व नव निर्वाचित नगर सेवकांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. 

     नवनिर्वाचित नगरसेवक रमाकांत मडवी, साक्षी रमाकांत मडवी, दिपक जाधव, दर्शना चरणदास म्हात्रे, शैलेश पाटील, स्नेहा अमर पाटील, आदेश कमलाकर भगत, दिपाली उमेश भगत, अर्चना निलेश पाटील यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दिवा परिसरातील बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

     यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिवा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच बंजारा समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. संत सेवालाल गोर बंजारा समितीच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.

     तसेच संत श्री सेवालाल गोरबंजारा समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार मिथुन आडे, विजय पवार, वसिया राठोड, सुनिल पवार, लक्ष्मण चव्हाण, गणेश पवार, रमेश राठोड, सुभाष राठोड, संतोष पवार, प्रविण राठोड, रामेश्वर पवार, प्रमोद राठोड, श्याम राठोड, चहु चव्हाण यांच्यासह समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी सदस्य चंद्रसिंह राठोड, बाबु राठोड, देवीदास राठोड यांनी आपली उपस्थिती दर्शवली.


Post a Comment

Previous Post Next Post