"समरसतेचा वारकरी" ग्रंथ गौरव सोहळा २६ जुलै रोजी कल्याण येथे

"समरसतेचा वारकरी" ग्रंथ गौरव सोहळा २६ जुलै रोजी कल्याण येथे

सामाजिक समरसता व भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कल्याण : भटके-विमुक्त समाजाच्या सामाजिक समरसता, शिक्षण, संघटन आणि सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने कार्य करणारे पद्मश्री भिकू रामजी इदाते (दादा इदाते) यांच्या संघर्षमय, समर्पित आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित "समरसतेचा वारकरी" या गौरवग्रंथाच्या निमित्ताने "समरसतेचा वारकरी ग्रंथ गौरव सोहळा" रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, क्लब हाऊस, Asterdale Building, झुलेलाल चौक, खडकपाडा, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

"समरसतेचा वारकरी" हा गौरवग्रंथ लेखिका सौ. नीलिमा देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने साकारला असून तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झाला आहे. सामाजिक समरसता, राष्ट्रनिर्मिती आणि भटके-विमुक्त समाजाच्या विकासकार्याचा प्रेरणादायी दस्तऐवज म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते.

या कार्यक्रमाचे गौरवमूर्ती म्हणून पद्मश्री भिकू रामजी इदाते (दादा इदाते) उपस्थित राहणार आहेत. डॉ. रमेश पांडव जी, अखिल भारतीय समरसता बस्ती प्रमुख, समरसता गतिविधी मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमास मा. श्री. नितीन शिंत्रे जी (माननीय संघ चालक, रा.स्व.संघ कल्याण जिल्हा), मा. श्री. जगन्नाथ जी पाटील (माजी मंत्री, महाराष्ट्र शासन), मा. श्री. किसन जी कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा), मा. श्री. अनिल फड (कार्यवाह, अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद) तसेच मा. सौ. नीलिमा जी देशपांडे (लेखिका – समरसतेचा वारकरी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

भटके-विमुक्त समाजाचे सक्षमीकरण, सामाजिक समरसता, शिक्षण, संघटन, सेवा आणि राष्ट्रनिर्मिती या विषयांवर कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, कार्यकर्ते, अभ्यासक, युवक-युवती तसेच समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शिव-निरंजन सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अ. भा.) महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.सुदाम शिंदे,श्री. राहुल परदेशी,विकास जगताप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post