बदलापूर (नितीन जाधव) : आपल्या भारत देशात विविध संस्कृती निर्माण झाल्या आणि काही कारणास्तव त्या विनाश ही झाल्या. परंतु पाच हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेली बंजारा संस्कृती, रूढी परंपरा, चालीरिती, रिवाज, अजूनही कायम ठेवण्यात बंजारा समाज यशस्वी आहे. परंतु आधुनिक काळाच्या युगात बंजारा संस्कृतीच्या काही चालीरिती रिवाज विलोप होण्याच्या मार्गावर दिसून येते. त्यामुळे शहरी भागातील समाज बांधवांनी आपली रुढी परंपरा कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सामाजिक कार्यात पुढाकार घेणे व आपली संस्कृती जतन करणे काळाची गरज आहे.
आपली संस्कृती, आपला वसा ! आपली संस्कृती आपणच जपा !! या उक्तीप्रमाणे बंजारा उत्सव समुदाय बदलापूर शहर च्या वतीने तीज उत्सव सोहळा दि:- 2/09/2023 ते 10/09/2023 पर्यंत एकुण नऊ दिवसा करिता करण्यात आला होता. यादरम्यान बदलापूर शहरातील विविध सोसायटीमध्ये जाऊन बंजारा समाजाच्या माता भगिनींनी आपल्या संस्कृतीनुसार पारंपारिक नृत्याचा आनंद घेतला. नवव्या दिवशी म्हणजे तिज विसर्जन व तोडणी कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मैदान शिरगाव बदलापूर पूर्व येथे आयोजन व नियोजन करण्यात आले होते. बदलापूर शहरातील विविध सोसायटी मधून मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते. या प्रसंगी सन्माननीय खासदार श्री. हरिभाऊ राठोड , सन्माननीय नगरसेवक श्री. अरुणभाऊ सुरवळ, कु.सिमा आडे लोकमत रिपोर्टर मुंबई, सन्माननीय श्री विठ्ठल चव्हाण गोर सेना उपविभागीय अध्यक्ष मुंबई हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा श्री बाळकृष्ण राठोड नायक, श्री विनोद जाधव कारभारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बदुसिंग राठोड यांनी केले. तर प्रास्ताविक नितीन जाधव यांनी केले. श्री.दिलीप राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. बंजारा उत्सव समुदायाचे नायक श्री. बाळकृष्ण राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.
अतिशय आनंदमय आणि उत्साह पूर्ण वातावरणामध्ये बंजारा संस्कृतीनुसार पारंपारिक नृत्य करत तिज विसर्जन मिरवणूक काढून तिज विसर्जन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक समाज बांधवांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य लाभले. शिवाजी राठोड, निलेश जाधव, विकिन आडे, प्रशांत चव्हाण,दयाराम राठोड, इंद्रजीत राठोड,वकील राठोड, ज्ञानेश्वर राठोड, शंकर राठोड, संतोष राठोड, अविनाश जाधव, सुरेश चव्हाण, अनिल चव्हाण, गोकुळ दास जाधव, अविनाश राठोड,अरुण जाधव, प्रेम चव्हाण,पन्नालाल राठोड, बाळु राठोड ,प्रेम राठोड, मनोज राठोड,संतोष आडे, विशाल राठोड मांगीलाल जाधव, सुरेश पवार,अनिल राठोड, अमोल जाधव, रुपेश जाधव, किशोर जाधव, नागेश राठोड, वलिसिंग जाधव, उमेश राठोड, खुशाल राठोड गोविंद चव्हाण इतर समाज बांधवासह माता भगिनी उपस्थित होत्या. सर्व स्तरावरून या कार्यक्रमाचे भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.