मुंबई : रुग्णमित्र प्रमोद राठोड चित्रा जाधव व ठाणे कल्याण वैद्यकीय सहाय्यता करणाऱ्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडणारे "मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे" यांची मंत्रालय येथे भेट घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मदत प्रणाली जाणून घेतली.
रुग्णांच्या उपचाराकरिता अर्थसहाय्य जमा करण्यास अनेक कसरती कराव्या लागतात. अशातच एखादा रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त असल्यास त्यासाठीची आर्थिक मदत मिळवण्यासाठी "मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीच्या अपेक्षेने प्रयत्नशील राहतो. अशा रुग्णांना येणाऱ्या अडचणी, अर्जामधील राहणाऱ्या त्रुटी तसेच या कक्षाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी ही भेट होती, अशी माहिती प्रमोद राठोड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD श्री मंगेशजी चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख श्री. राम हरी राऊत व ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते, धनंजय पवार व विनोद साडविलकरजी यांचे नेहमीच मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले असल्याचे राठोड यांनी सांगितले.
सोबत गोपाल राठोड, पद्मा राठोड, सुजाता थोरात, संदेश थोरात, दिपक पवार, महेश राव, दत्ता सलगर, मिथुन राठोड, संजय माने, प्रभाकर राठोड, प्रवीण भोसले, विजय राठोड इ. रुग्णमित्र बैठकीत उपस्थित होते.
Tags
मुंबई