मुंबई : ७ जानेवारी २०२४ रोजी ओबीसी महामेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, काही झाले तरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळून देणार नाही. परंतु जरांगे पाटील यांची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे, ते आता ओबीसीच्या १९% आरक्षणात येणार आहेत.
VIDEO
माझे छगन भुजबळ यांना सवाल आहे की ,आता कुणबी म्हणून नोंदी मिळणाऱ्या मराठा बांधवांना ते कसे रोखणार आहे, म्हणून मी वारंवार सांगत आहे की, रोहिणी आयोगाच्या नियमानुसार मराठा कुणबी वेगळा प्रवर्ग तयार करून त्यांना वेगळा आरक्षण द्यावे. जेणेकरून सर्वांना सामाजिक न्याय मिळेल. इतकी साधी सरळ बाब भुजबळ यांना कळत नसेल, तर भुजबळांना आरक्षण कळते का ? असा टोला आरक्षण अभ्यासक तथा माजी खासदार हरिसभाऊ राठोड यांनी लगावला आहे.
Tags
मुंबई