प्रा.विद्या ताराचंद कुमरे यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांच्या कविता आणि लेख नेहमी वर्तमानपत्रात प्रकाशित होत असतात.
गडचिरोली : साहित्य दर्पण कला मंच नागपूर या समूहाच्या वतीने आयोजित दिनांक १८ मे २०२५ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलनात प्रा. विद्या ताराचंद कुमरे यांना राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२५ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रा. विद्या ताराचंद कुमरे या साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, गिलगाव बाजार गडचिरोली येथे मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल प्राचार्य संजय वाळके व सर्व शिक्षक, प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी, गिलगाव बाजार गडचिरोली, समूह संस्थापिका कल्पना टेंभुर्णीकर नागपूर, समूह संस्थापक प्रा. नानाजी रामटेके आरमोरी जिल्हा गडचिरोली, समूह प्रशासिका निता बागुल नाशिक, समूह कार्याध्यक्ष मधुकर गोपनारायण नागपूर, समूह प्रकाशक सीताराम नरके पुणे आदींनी अभिनंदन केले आहे. प्रा. विद्या ताराचंद कुमरे यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कविता आणि लेख नेहमीच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत. या निवडीबद्दल परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.