चाळीसगाव तालुक्यात प्रथमच बंजारा समाजाचा ऐतिहासिक मोर्चा.
लाखाच्या जवळपास समाज बांधवांचा मोर्च्यात सहभाग नोंदवला.
आरक्षणाच्या या लढ्यात चाळीसगाव तालुक्यातील समाज बांधवांनी क्रांतिकारक पाऊल टाकले असून आरक्षण मिळेपर्यंत वाट्टेल ते संघर्ष करण्याची तयारी तालुक्याने दर्शवली आहे.
चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, अपेक्षेपेक्षा जास्त समाज बांधव मोर्च्यात उतरला. हैद्राबाद गॅझेटिअरसह, सेपी बेरार, विदात्ते आयोग व इतर सर्व आयोगाच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्या संदर्भात वेळीच राज्य शासनाने केद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आली.
सबंध महाराष्ट्रातील बंजारा समाज स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरला असून खर्या अर्थाने मराठा समाजाच्या आंदोलनाला आलेल्या यशानंतर हैद्राबाद गॅझेटच्या निमित्ताने चमत्कारीकरित्या समाजात मोठी जागृती आली आहे. पुढील महिन्याभरात राज्य सरकारने सकारात्मक हालचाली केल्या नाहीत तर बंजारा समाजाचे हे वादळ मुंबईत धडकल्याशिवाय राहणार नाही. वेळ पडली तर दिल्लीतही बंजारा धडकणार, असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.
नुकताच जालना, व बिड जिल्ह्यात निघालेल्या लाखोंच्या मोर्चाने सबंध महाराष्ट्र पेटून उठला आहे, मोर्चाला संबोधित करण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार राजेशभाऊ राठोड, युवा संघर्ष योध्दे, विनोद भाऊ आडे, ऋषिकेश चव्हाण, कांतिलाल नाईक, डॉ. साईदास जाधव, आत्माराम जाधव, ओंकार आबा जाधव, सभंजीनगरहू महिला समाजिक कार्यकर्त्या मनिषाताई राठोड, , आदी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले होते. तसेच तालुक्यातील जेष्ठ नेते सुभाष दादा चव्हाण, रामदास रायसिंग जाधव,प्राणि मित्र इंदल चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे रा. अध्यक्ष राकेश भाऊ जाधव, भा. बहुजन क्रांती दलाचे रा. अध्यक्ष, मोरसिंग भाऊ राठोड , राजेंद्र राठोड, सुधाकर भाऊ राठोड आदी विविध पक्ष, संघटनेच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सकल बंजारा समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्व जेष्ठ मंडळींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले, मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व युवा तरूण कार्यकर्त्यांनी स्व प्रेरणेने मोठे परिश्रम घेतले. शिस्तबद्ध शांततेत मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व तरूण स्वयंसेवक बांधवांनी मोठे परिश्रम घेतले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भिमराव जाधव यांनी दिली.
Tags
जळगांव