‘दिलखुलास’ कार्यक्रमात नामवंत आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नामवंत आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 3 आणि मंगळवार दि. 4 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.

अन्नसुरक्षेचे आहारातील महत्त्व जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामवंत आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी पौष्टिक आहाराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ऐकता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post