“हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नियोजन भवन, ठाणे येथे बैठक संपन्न

 

ठाणे  (सतिष एस राठोड) : राज्य शासनाच्या वतीने वतीने “हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. संबंधित विभागांचे अधिकारी, आयोजक मंडळाचे प्रतिनिधी व विविध समित्यांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

    बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता तसेच प्रचार व प्रसिद्धी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

निवास व्यवस्था :

राज्य तसेच देशातून येणाऱ्या भाविकांसाठी विश्रामगृहे, तसेच तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.

वाहतूक व्यवस्था :

कार्यक्रम स्थळी ये-जा करण्यासाठी विशेष बस सेवा, पार्किंग व्यवस्था व वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य सुविधा :

कार्यक्रम स्थळी प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय पथक तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष आरोग्य कक्ष उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

प्रचार व प्रसिद्धी :

कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया, बॅनर्स, होर्डिंग्ज आदींचा वापर. विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या माध्यमातूनही जनजागृती.

बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. “हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन हा शहीदी समागम भक्तीभावाने व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post