" आमच्या शाळेत स्मार्ट सिटी ई - क्लासरूम प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक वर्गात स्मार्ट सिटी लावला असून आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्मार्ट पद्धतीने त्यावर शिकवतात, त्या साठी आमच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले असून, त्याच्या मदतीला मागील शैक्षणिक वर्षात एक्स्पर्ट फॅसिलिटेटर्स ही एका वर्षासाठी शाळेत नेमले होते, येत्या शैक्षणिक वर्षात एक IT एक्स्पर्ट फॅसिलिटेटिर्स प्रत्येक शाळेत द्यावा अशी आमची मागणी आहे. तसेच कॉम्पुटर आणि स्टेम लॅब चा वापर आमची मुले चांगल्या पद्धतीने करतात त्यामुळे ह्या एक्स्पर्ट कडून आमच्या विद्यार्त्याना त्यांचा फायदाच होईल. "
- मुख्याध्यापिका, खिवंसरा प्राथमिक शाळा, थेरगाव
पिंपरी चिंचवड : स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या म्युनिसिपल ई -क्लासरूम प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगपालिका शाळांचा दर्जा वाढवणार असून त्यासाठी प्रयन्त सुरु झाले आहेत. प्रकल्पा अंतर्गत कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, स्मार्ट क्लासरूम चे काम बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड आणि ऍडिक सोल्युशन प्रा. लि. मार्फत यापूर्वीच गेल्या शैक्षणिक वर्षात पूर्ण झाले होते. व याचा फायदा पालिकेच्या शाळेत शिकत असणाऱ्या जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना होत होता, पण याच्याही पुढे जाऊन संगणक विभागाच्या मार्गदर्शनानुसार बेनेट कोलमन आणि ऍडिक सोल्युशन यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या साठी आर्टीफिसिअल इंटेलिजन्स च्या धर्ती वर सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली जात आहे.
ज्या द्वारे विद्यार्थ्यांची हजेरी हि AI द्वारे ऑटोमॅटिक लागली जाणार आहे, त्या साठी स्मार्ट सिटी ने प्रत्येक वर्गात कॅमेरे बसलले असून, विधार्थी वर्गात बसला कि त्याचा फोटो कॅमेऱ्या मार्फत घेतला जाईल व अश्या फ्रेम्स दर ३ मिनिटात घेतल्या जातील व त्यावरून AI सॉफ्टवेअर प्रणालीने विदयार्थी वर्गात कधी व किती तास उपस्थित होता ह्याचा अहवाल पालिकेला मिळणार आहे, या चा नुकताच डेमो पालिकेच्या कांतीलाल खिवंसरा प्राथमिक शाळा, थेरगाव येथे करण्यात आला. Attendance मॉडेल नंतर विद्यार्थ्यांचे Behavior Analysis यावरही काम होणार असून, येत्या शैक्षणिक वर्षात AI Attendance मॉडेल सुरु करण्याच्या दृष्टीने काम सुरु असल्याचे प्रकल्प प्रतिनिधींनी सांगितले आहे.
