प्रकाश राठोड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या टीमचे देखील कौतुक केले जात आहे.
ठाणे : घोडबंदर रोड परिसरातील ओरियन बिझनेस पार्कला मंगळवार रोजी रात्री 8 वाजता लागलेली आग आणि त्या आगीतून २०० पेक्षा जास्त कर्मचारी हे सुख रूप बचावले, आणि त्या आगीच्या निमित्ताने एक नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राठोड यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे २०० कर्मचारी सुखरूप बाहेर पडू शकल्याचे उघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांना वेळीच आग लागल्याची माहिती मिळाली नसती तर त्यांच्यावर मोठे संकट ओढवले असते. तसेच राठोड यांच्या नातेवाईकाच्या कंपनीत ३० ते ३५ कर्मचारी काम करत होते. कर्मचाऱ्यांनी आगीबाबत राठोड यांना कळविले. राठोड यांनी पाच जणांची टीम तयार करून लोकांचे प्राण वाचविण्याचे काम केले. या आगीची सुरुवात ओरियन बिजनेस पार्कमधील चौथ्या माळ्यापासून झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रकाश राठोड यांनी दिली.
तब्बल अकरा तासांहून अधिक काळाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या दोन विभागांना यश आले.
ठामपा अग्निशमन दलाच्या मदतीला मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठामपा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, तसेच अतिरिक्त आयुक्त. उपायुक्त यानी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्यावर ११ तासांनी आग नियंत्रणात आली.
आग शमविण्यासाठी सात फायर इंजिन, दोन रेस्क्यू वाहन, आठ वॉटर टँकर, तीन जम्बो वॉटर टैंकर, एक ब्रांनटो वाहन, सहा जीप, एक बुलेट, चार ठामपा पाणीपुरवठा विभागामार्फत प्रायव्हेट वॉटर टँकर आणि एक ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पिकअप वाहन व दोन जेसीबी मशीन पाचारण करण्यात आले होते, ओरियन बिझनेस पार्क ही तळ अधिक पाच मजली इमारत असून, तेथे ८० ते ९० ऑफिस गाळे आहेत. एसीच्या गॅसचा स्फोट होऊन आग आणखी भडकली. दरम्यान, आग हळूहळू पार्कच्या टेरेसवर पोहोचली. तसेच या आगीची झळ ही बाजूला असलेल्या सिनेवंडर या मॉलला लागली होती.
ठामपा अग्निशमन दलाच्या मदतीला मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवडी- निजामपूर, मीरा-भाईंदर आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठामपा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, तसेच अतिरिक्त आयुक्त. उपायुक्त यानी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्यावर ११ तासांनी आग नियंत्रणात आली.
प्रकाश राठोड यांच्या टीमने पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली व इतर कामात मदत करत होते.
श्री प्रकाश राठोड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच त्यांच्या टीमचे देखील कौतुक केले जात आहे.

