ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार
ठाणे : महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आजवरच्या जीवन वाटचालीचा वेध घेणारे ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ हे चरित्रपर पुस्तक लेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिले असून, हा चरित्रग्रंथ ‘ग्रंथाली’ प्रकाशनाद्वारे प्रकाशित होत आहे. या चरित्रग्रंथाचा प्रकाशन समारंभ शारदा एज्युकेशन सोसायटी, ग्रंथाली आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ एप्रिल २०२३ रोजी नियोजित करण्यात आला होता. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम त्या दिवशी होऊ शकला नाही. मात्र, आता हा प्रकाशन समारंभ मंगळवार, ३० मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे पुनर्आयोजित केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम मा. रमेशजी बैस, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराजजी चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मा. मधु मंगेश कर्णिक, पालकमंत्री मा. शंभूराजजी देसाई, खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे, तसेच गायक मा. अनुप जलोटा, मा. सुरेश वाडकर, मा. सोनू निगम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक मा. ना. उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा. नरेश म्हस्के*, शिवसेना प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाप्रमुख हे आहेत.