पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ११२ शाळांमध्ये आर्टीफिसिअल इंटेलिजिएन्स बेस्ड attendance प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे इमोशन आणि behavior विश्लेषक करण्याचे सॉफ्टवेअर येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले असून, त्यासाठी दि. १ मे रोजी पालिकेच्या ११२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे रजिस्ट्रेशन बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड आणि मे. ऐडीक सोल्युशन प्रा. लि. यांच्या मार्फत शिक्षण विभागाच्या आदेशाने करण्यात आले. त्यासाठी दिनांक २८ आणि २९ एप्रिल रोजी शाळेतील शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. आणि दिनांक १ मे रोजी प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी एक मोबाइल ऍप्लिकेशन विकसित करण्यात आले असून त्या द्वारे विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, तुकडी, जन्म दिनांक, ब्लड गृप, पालकांची माहिती, पत्ता, मोबाईल नंबर आणि त्यांचा ३ वेगवेगळ्या अँगल चा फोटो आप्लिकेशन द्वारे घेतला गेला. प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या मदतीला मे. ऐडीक सोल्युशन यांनी नेमलेले ३५ समन्वयक यांनी वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले व ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांना मदत केली.
जवळपास 5300 विद्यार्थी व ५७२ शिक्षकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यावर प्रक्रिया करून मॉडेल परिपक्व करण्याचे काम या महिन्यात होणार असून येत्या शैक्षणिक वर्षा पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
राहिलेल्या व नवीन ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी १४ जून नंतर करण्यात येणार आहे.
पालिकेच्या एकूण ११२ शाळा असून १ मे च्या रजिस्ट्रेशन ड्राईव्ह मध्ये बहुतांश प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केले. परंतु ज्या शाळेत विद्यार्थी उपलब्ध नव्हते अश्या शाळांमध्ये शाळा सुरु झाल्यावर पहिल्याच आठवड्यात रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबवणार असल्याचे प्रकल्प प्रतिनिंधीनी सांगितले आहे.
असा आहे ई- क्लासरूम प्रकल्प : स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प राबविला जात असून, त्यात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्ही , कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, शाळेच्या आतील नेटवर्किंग, मल्टिमिडीया कन्टेन्ट, बाला आणि AI आधारित शैक्षणिक प्रणाली याचा समावेश आहे, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्ही , कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, शाळेच्या आतील नेटवर्किंग, मल्टिमिडीया कन्टेन्ट पालिकेच्या ११२ शाळां मध्ये दोन टप्पात बसविण्याचे काम एप्रिल २०२१ मधेच पूर्ण झाले होते त्यातील बाला घटका अंतर्गत एकूण ४० शाळांमध्ये शैक्षणिक पैंटिंचे काम शिक्षण विभागाच्या ऑर्डर नुसार एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण झाले असून आता AI सॉफ्टवेअर चे काम सुरु आहे.
