मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नांदेड येथील बोडार, हवेली या गावात अक्षय भालेराव या युवकानी साजरी केली या गोष्टीचा राग मनात धरून गावातील मनुवादी प्रवृत्तीच्या जातीवादी गाव गुडांनी अक्षय ची निघृण हत्या केली ,या घडलेल्या प्रकाराचा निषेध करत असून भारतीय राज्यघटनेने कलम १४ नुसार प्रत्येकाला आपले धर्माचे पालन पोषण करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु आजही कुजलेल्या मनुवादी जातीवादी विचारातून काही लोक बाहेर आलेले नाहीत ही खेदाची बाब आहे. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे समाजातील प्रत्येक घटकास न्याय मिळाला असून त्याच महामानवाची जयंती गावात साजरी केली म्हणून जातीवादी प्रवृत्तीच्या हरामखोराने अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या केली, या घडलेल्या घटनेचा फक्त निषेध करून चालणार नाही तर या जातीवादी गावगुंडांना भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्रीय समितीचे वरिष्ठ नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.