आ. यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू, आ. देवेंद्र भुयार विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार काय ?
अटल भूजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला अभय कुणाचे !
मोर्शी तालुका प्रतिनिधी
अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून ड्राय झोन असलेल्या मोर्शी, वरूड, चांदुरबाजार तालुका अटल भूजल योजनेत सविष्ट असून या तिन्ही तालुक्यातील २१७ गावातील अटल भूजल योजना फक्त गावाच्या वेशीवरील बोर्डावरच दिसून येत आहे. खरतर या योजनेंतर्गत गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट तसेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे, पर्जन्यमापक यंत्र बसविणे, पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिजोमिटर बसविणे, नाला खोलीकरण करणे, बंधारे दुरुस्ती करणे यासह विवीध प्रकारची जल संधारणाची कामे अभिसरणातून व लोकांच्या मदतीने केली जातात, अशी अनेक कामे ड्राय झोन असलेल्या मोर्शी, वरूड, चांदुरबाजार तालुक्यात करणे गरजेचे आहे. मात्र याकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून जी कामे केली जात आहेत ते निकृष्ट दर्जाची असल्याने या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला असून सदर ची योजना फक्त कागदावरच राहणार आहे का ? असा सवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोर्शी,वरूड, चांदुरबाजार तालुका हा कायम दुष्काळीच ठेवायचा आहे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपस्थित केला असून मोर्शी वरूड चांदूरबाजार तालुक्यातील २१७ गावातील संपूर्ण कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, आ. यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू, आ. देवेंद्र भुयार यांच्याकडे केली होती मात्र या गंभीर प्रकारची कोणीही दखल घेतांना दिसत नसल्यामुळे मोर्शी वरूड चांदुर बाजार तालुक्यात अटल भूजल योजनेचा बट्ट्याबोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्ताधारी व विरोधी राजकीय नेत्यांचे, शासकीय यंत्रणेचे पाठबळ मिळत आहे काय असा सवाल उपस्थित केल्या जात असून अटल भूजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला अभय कुणाचे हा चर्चेचा विषय ठरत असून
पालकमंत्री देवेंद्र फडणविस, आमदर यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार देवेंद्र भुयार विधानसभेत प्रश्न उपस्थित करून संपूर्ण कामांची चौकशी करणार काय याकडे मोर्शी वरूड चांदुर बाजार तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
कायम दुष्काळी म्हणून उल्लेख असलेल्या मोर्शी, वरूड, चांदुर बाजार तालुक्यात या योजनेचा बट्याबोळ होत असल्याचे चित्र निर्माण होतांना दिसत आहे. अटल भूजल योजने सहभागी असलेल्या ग्रामपंचायतीला रिचार्ज शप्ट बसविण्यासाठी साधारण १ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च करून कामे करण्यात आली परंतु ती कामे एमबी प्रमाणे व चांगल्या दर्जाची नाहीत अशी तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच ते एम. बी प्रमाणे मोजमाप करून देण्याची मागणी सरपंच यांनी केली पण त्यांच्या मागणीला भुजल विभागाचे अधिकारी हवेत उडवून देत आहेत.त्यामुळे या कामात काळा बाजार झाला असल्याची शंका येत आहे. सरपंच व ग्रामपंचायतिने सूचाविलेली कामे अद्याप कुठेही होतांना दिसत नाही. भुजल सर्वेक्षण विभागा कडून फक्त आश्वासणे मिळत असून गावात असंतोष निर्माण होत आहे.
डी आय पी संस्थांचा गजब कारभार
अटल भुजल मधील नियुक्त संस्था चा कारभार सुद्धा अजब-गजब सुरु आहे. काही संस्था कडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तर काही संस्था चे मनुष्यबळ निकषा प्रमाणे नाहीत. कर्मचाऱ्यांच्या अनुभवाची अट असतांना विना अनुभव लोकांना घेऊन मनमानी कारभार सुरु आहे. तर कुठे सर्व नियम कागदावरच ठेऊन अनुदान लाटणे सुरु असल्याचे दिसत आहे.)
भुजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जल संधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाययोजनांद्वारे भुजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा अटल भूजल योजनेचा मुख्य हेतू आहे. पाण्याच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे अटल भूजल योजना पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र ड्राय झोन असलेल्या मोर्शी, वरूड, चांदुरबाजार तालुक्यात दिसत आहे
- रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.