विभागीय चौकशी सुरू असताना पदोन्नती दिल्याबाबतच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणार

 

विभागीय चौकशी सुरू असताना पदोन्नती दिल्याबाबतच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणार

मुंबई : मुख्याधिकारी वर्ग-1 या पदावर विभागीय चौकशी सुरू असताना पदोन्नती दिल्याबाबतच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, पदोन्नतीच्या विचारक्षेत्रातील अधिकाऱ्यांसंदर्भात विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण सुरू आहे किंवा कसे ही बाब विचारात घेऊन पदोन्नती समितीकडून निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे मुख्याधिकारी वर्ग-1 या पदावर विभागीय चौकशी सुरू असताना पदोन्नती दिली. याबाबतच्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून सभागृहातील सदस्यांना याबाबत अवगत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post