- करता करता शिक्षणाची सोय; ड्युएल डिग्रीची सोय उपलब्ध.
- विद्यार्थ्यांना विविध शिक्षणक्रमांचे पर्याय खुले.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु !
मुंबई : आता पारंपारिक विद्यापीठाच्या पदवी सोबतच मुक्त विद्यापीठाची पदवीही करता येणार आहे. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठात पदवीसोबत पदविका/ प्रमाणपत्र शिक्षणक्रम शिकता येणार आहे.
राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ आहे.
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत) रू. १९०/- मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश मिळणार आहे.
काम करता करता शिक्षणाची सोय; ड्युएल डिग्रीची सोय उपलब्ध असून विद्यार्थ्यांना विविध शिक्षणक्रमांचे पर्याय खुले आहेत.
पदव्युत्तर पदवी स्तरावरील ८ , पदवी स्तरावरील ११ , पदविका स्तरावरील ३९ , प्रमाणपत्र स्तरावरील २५ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू आहेत.
आपल्या आवडत्या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac अथवा www.ycmou.ac.inया संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा मुंबई विभागीय केंद्राच्या खालील पत्त्यावर चौकशीसाठी संपर्क साधावा.
य. च. म. मु. वि. चे विभागीय कार्यालय मुंबई –
द्वारा जगन्नाथ शंकरशेठ मनपा शाळा, दुसरा मजला,
नाना चौक, ग्रँट रोड (प.), मुंबई 400 007.
दूरध्वनी क्रमांक – (022) 23874180, 23874187, 23874177, 23874183
इमेल- rd_mumbai@ycmou.digitaluniversity.ac