नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा 'सेवारत्न पुरस्काराने' गौरव

नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा 'सेवारत्न पुरस्काराने' गौरव

मुंबई (सतिष एस राठोड ) : डायसाण फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी देण्यात येणारा सेवारत्न पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात डॉ. लहाने यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. डायसाण फाउंडेशनचे सचिव डॉ. अतुल राठोड व सौ. वैशाली राठोड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले आहे.



डॉ. तात्याराव लहाने हे नाव राज्यातील अगदी गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले आहे. या माणसाने हजारो दृष्टीहीन नागरिकांसाठी काम केले आहे. लाखो रुग्णांची सेवा केली. तात्याराव लहाने यांच्या कर्तृत्वाचं नेहमी कौतुक केलं जातं. विशेष म्हणजे तात्याराव लहाने हे सेवानिवृत्तीनंतरही ते आज आपलं कर्तव्य बजावत आहेत. डॉ. लहाने यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. बिनटाक्याच्या नेत्र शस्त्रकियेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी दीड लाखाहून अधिक लोकांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आणि 50 लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.



डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने हे नेत्र शल्यचिकित्सक आहेत आणि नेत्र शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक तंत्रात प्रभुत्व मिळविण्याकरिता आणि महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागात नेत्ररोगशास्त्रातील अग्रगण्य समुदायासाठी त्यांनी दोघांनाही मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील मेकगाव या छोट्याशा खेड्यात गरीब शेतकरी मुलगा म्हणून जन्मलेले डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने यांनी 1981 मध्ये मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मेडिसीन क्षेत्रात पदवी घेतली. शल्यक्रिया प्रशिक्षण घेतले आणि 1985 मध्ये त्याच विद्यापीठातून नेत्ररोगशास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी पास केली.

Post a Comment

Previous Post Next Post