बदलापूर ( प्रतिनिधी : नितीन जाधव ) : भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या वतीने नेहमी समाज हित दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबविण्यात येतात.
महाराष्ट्र राज्यात संस्थेच्या विविध विभागात शाखा मार्फत निरंतर स्वरूपात कार्य सुरू राहते. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा, देण्यासाठी काम करत असते. याचे औचित्य साधून भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था बदलापूर शहर च्या वतीने दि. 19/9/2023 रोजी, सकाळी 10:00 वाजता समाज बांधव झुंबर भाऊ जाधव व सौ. मनिषा झुंबर जाधव यांच्या सुकन्या कु. श्रावणी जाधव, व तनुश्री जाधव या दोन्ही सुकन्याने तुळजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय तायकंदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल त्यांच्या राहत्या घरी गृह भेट देऊन दोन्ही सुवर्ण कन्याचे भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था बदलापूर शहरच्या वतीने यशोइच्छित सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व संस्थेच्या वतीने आर्थिक सहाय्य देऊन राजस्थान येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रोत्साहन उपस्थित पदाधिकारी , सदस्य, सभासद यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नितीन जाधव प्रदेश सहसचिव, विजयकुमार राठोड विभागीय अध्यक्ष, अमोल राठोड कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा, दिलीप राठोड उपाध्यक्ष मुंबई, अविनाश जाधव शहराध्यक्ष बदलापूर, अनिल जाधव कार्याध्यक्ष बदलापूर शहर, सुधाकर पवार खजिनदार बदलापूर शहर , वलिसिंग जाधव संघटन सचिव, ज्ञानेश्वर राठोड प्रसिद्धी प्रमुख, इंद्रजीत राठोड, सुरेश पवार, मांगीलाल जाधव, प्रवीण राठोड, दत्ता राठोड भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे बदलापूर स्थित पदाधिकारी, सदस्य, आजीवन सभासद उपस्थित होते.