मुंबई : सेवा फाऊंडेशन संस्थापक श्री प्रकाश शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गोर गरीब गरजू लोकांची मुंबई सारख्या मोठ्या शहरात हॉस्पिटल संदर्भात होणारी परवड , त्रास, व आर्थिक संकटाच्या बाबतीत तळमळीने दखल घेऊन समाजातील पूर्ण प्रशासकिय यंत्रणेची कायदेशीर माहिती असणारे व अत्यंत कमी वयात सामाजिक कार्याची आवड असल्याने, प्रत्यक्षात रुग्णांना काळजी पूर्वक आपुलकीने मदत पोहचविणारे श्री प्रमोद राठोड यांना सोबत घेऊन तसेच इतर खूप सारे मान्यवर यांचे सहकार्याने सेवा फाउंडेशन ही संस्था स्थापन केलेली आहे. सदर संस्थेचे संस्थापक स्वतः श्री प्रकाश राठोड हे आहेत तर कार्याध्यक्ष श्री प्रमोद राठोड आहेत.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ,मुख्यमंत्री सहायता कक्षाचे श्री मंगेश चिवटे व खूप सारे IAS, IPS अधिकारी, मंत्रालयातील मान्यवर मंत्री, विविध खाजगी ट्रस्ट, उद्योगपती सेवा " फाउंडेशन संस्थे " सोबत असल्याने सेवा कार्य अगदी जलद गतीने उत्तम प्रकारे चालू आहे.
मुंबई सारख्या शहरात योग्य उपचार मिळतील या आशेने महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून गोर गरीब रुग्ण इकडे येतात. परंतु आर्थिक कमजोरी, माहितीचा अभाव तसेच रहाण्याची सोय नसल्याने त्यांचे खूप हाल होतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य संदर्भात खूप साऱ्या योजना देखील आहेत. परंतु त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी सुद्धा सेवा फाउंडेशन ही संस्था अगदी जलदगतीने कार्य करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण सहकार्य या संस्थेला आहे.
सेवा फाउंडेशन संस्थे मार्फत मुंबईत येणाऱ्या गोर गरीब रुग्णांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करणे, त्यांचे नातेवाईकांना मोफत रहाण्याची सोय करणे, मोफत रुग्णवाहिका, कॅन्सर, किडनी, सारख्या गंभीर आजारासंदर्भात मोफत उपचार सेवा पुरविल्या जातात. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही रक्त हवे असल्यास 24/7 तास मोफत सेवा दिली जात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात संस्थेशी जोडलेले हजारो निःस्वार्थ सेवाभावी रक्त दाते (ब्लड डोनर), आहेत. मुंबई सारख्या शहरात वृद्ध आई वडील , मनोरुग्ण यांच्यासाठी केअर टेकर तसेच काळजी घेण्यासाठी योग्य त्या काळजीवाहू सेवकांची नियुक्ती ही केली जाते.
सेवा फाउंडेशन संस्थेच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असून महाराष्ट्राच्या अनेक भागातून ते जोडले जात आहेत. इतर विविध छोट्या मोठ्या धर्मदाय संस्था देखील हळू हळू जोडल्या जात आहेत.
हॉस्पिटल संदर्भात कुणालाही कधीही मदतीची गरज असल्यास त्वरित सेवा फाउंडेशन चे कार्यालय -ठाणे कापूरवाडी लेक सिटी मॉल ग्राउंड फ्लोअर प्रॉपर्टी कट्टा ऑफिस जवळ येथे संपर्क साधावा. तसेच sevafoundationgroup.org या वेबसाईटवर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जलदगतीने मदत मिळण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
● कार्याध्यक्ष - श्री प्रमोद राठोड
मो. 74987 90584
● उपाध्यक्ष श्री दत्ता सलगर
मो. ७६२०४३०१७३
● सचिव - सौ चित्रा जाधव
मो . ७४९९९१८१०७
● संपर्क प्रमुख - श्री संजय माने
मो. ७४९९९१८१०७
● ठाणे विस्तारक - सौ पद्मा राठोड
मो. ९८९२०९२१२८