आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक यांची कैलासभाऊ तंवर, पत्रकार राठोड, पत्रकार चव्हाण, योगेश जाधव यांनी घेतली सदिच्छा भेट

आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक यांची कैलासभाऊ तंवर, पत्रकार राठोड, चव्हाण, योगेश जाधव यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई : आज मंत्रालयात ‘राज्यस्तरीय वैद्यकीय विशेष मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत श्री. रामेश्वरभाऊ नाईक यांची सदिच्छा भेट घेत मनमोकळ्या पणाने सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. सोबत कैलासभाऊ तंवर, पत्रकार कविराज चव्हाण, मंत्रालय न्यूजचे संपादक सतिष एस राठोड, योगेश जाधव हे देखील उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या अनेक वर्षापासून आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक हे रुग्णसेवा करीत आहेत.

मा. मंत्री (विधि व न्याय) यांच्या कार्यालयाच्या धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा गरीब रुग्णांना उपलब्ध करुन देणे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सदर राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे प्रमुख म्हणून श्री. रामेश्वरभाऊ नाईक हे कामकाज पाहत असतात. सदर कक्षाची कार्यकक्षा व अधिकारामध्ये धर्मादाय रूग्णालयातील निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे संपूर्ण अधिकार आरोग्यदूत रामेश्वरभाऊ यांच्याकडे आहे.

रामेश्वरभाऊ यांनी आजपर्यंत मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या मदतीने २५ लाखांहून अधिक रुग्णांच्या उपचारासाठी मदत केलेली आहे. यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, अनेक गरीब व गरजू रुग्णांची सेवा आजपर्यंत रामेश्वरभाऊ नाईक हे करत आहेत.

तसेच आजपर्यंत त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला व्यक्ती निराश होऊन कधीच माघारी आलेला नसून त्यांनी केलेल्या कार्याला बघूनच आज ते " आरोग्यदूत " म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर ते आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू व गरीब रुग्णांना सहकार्य करत असतात.

त्यांच्या या कार्याला मंत्रालय न्यूज तर्फे सलाम !

Post a Comment

Previous Post Next Post