रजत महोत्सवी कार्यक्रम राज्यस्तरीय अधिवेशन बंजारा समाजाला दिशा देणारे - राजेश राठोड, आमदार

रजत महोत्सवी कार्यक्रम राज्यस्तरीय अधिवेशन बंजारा समाजाला दिशा देणारे - राजेश राठोड, आमदार

(प्रतिनिधी : नितीन जाधव)

नांदेड : जेव्हा एखाद्या समाजातील सामाजिक संघटना, संस्था यांचे राज्यस्तरीय अधिवेशन होत असते. तेव्हा संपूर्ण समाजाचे लक्ष त्या सामाजिक संस्था, संघटनांच्या अधिवेशनाकडे समाजाचं लक्ष असतं. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था सन 1998 पासून बंजारा समाजातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी व समाजामध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून प्रयत्न करत आहे. विविध सामाजिक प्रश्न, समस्या, निराकरण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून निरंतर स्वरूपात प्रयत्न सुरूच आहे. त्यामध्ये पदोन्नतीचा प्रश्न, नॉन क्रिमीलेअर, वि.जा अ प्रवर्गातील बोगस घुसखोरी असो अश्या अनेक बाबतीत संस्थेकडून नेहमीच सहकार्य केले जाते.तसेच तांड्यातील शैक्षणिक प्रगती, सामाजिक एकता आणि एकजूट ठेवण्यासाठी समन्वयाची भूमिका निभावणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून या संस्थेची ओळख निर्माण झालेली आहे. ‌नांदेड येथे 2 व 3 फेब्रुवारी रोजी संस्थेचे दोन दिवसीय रजत महोत्सवी कार्यक्रम व राज्यस्तरीय अधिवेशन अतिशय उत्तम रित्या एकुण 10 सत्रात यशस्वीरित्या संपन्न झाले.

रजत महोत्सवी कार्यक्रम राज्यस्तरीय अधिवेशन बंजारा समाजाला दिशा देणारे - राजेश राठोड, आमदार


प्रथम सत्र

मा. डॉ. व्यंकटेश राठोड प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली 1998 पासून ते 2023 पर्यंत संस्थेसाठी योगदान देणाऱ्या व देत असलेल्या आजी-माजी पदाधिकारी सदस्य यांचा सन्मान व सत्कार करण्यात आले.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

द्वितीय सत्र

प्रदेशाध्यक्ष डॉ. व्यंकटेश भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सत्रामध्ये कार्यरत पदाधिकारी यांच्या कामकाजाचा लेखाजोखा व मनोगत व्यक्त करण्यात आले.

तृतीय सत्र

मा.डॉ.प्रा.कविवर्य विरा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली तृतीय सत्र संपन्न झाले. या सत्रामध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजातील एकूण 14 कवींनी आपला सहभाग नोंदविला. समाजातील राजकीय, शैक्षणिक स्थिती संदर्भात काव्य वाचन करून उपस्थित रसिक श्रोते वर्गांचे मन कविवर्य यांनी जिंकली. या सत्राचे संचालन निरंजन भाऊ मुडे यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम नितीन रमेश जाधव प्रदेश सचिव यांनी केले.

चतुर्थ सत्र

मा. श्री. जयराम पवार साहेब डेप्युटी कलेक्टर मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्ये अधिवेशनिय सत्र संपन्न झाले.या सत्राचे संचालन मा.अनिल राठोड कार्यालयीन सचिव यांनी केले.

साहित्य समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.

सन्माननीय डेप्युटी कलेक्टर श्री.जयराम पवार साहेब यांनी बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारा बंजारा सिंधु संस्कृतीचा इतिहासाला छोट्या पडद्यावर प्रक्षेपीत करून उपस्थित रसिक श्रोते गणांस सिंधू संस्कृती व बंजारा समाज संबंध विषयी सविस्तर माहिती दिली. सिंधू संस्कृतिकालीन  बंजारा रूढी, परंपरा, चालीरीती या संदर्भातील ऐतिहासिक माहिती देण्यात आली. या सत्रामध्ये समाजातील विविध मान्यवरांनी सहभाग घेतलेला होता.

सत्र पाचवे व सहावे संयुक्त

सन्माननीया डॉ.मायाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाचवे व सहावे सत्र संपन्न झाले. सौ. कविता राठोड उपाध्यक्ष यांनी संचालन केले. बंजारा संस्कृतीवर होणाऱ्या बाहेरील संक्रमण व संरक्षण, महिला सबलीकरण या विषयावर उपस्थित अनेक महिलांनी मत व्यक्त केली. ऍडव्होकेट साधनाताई राठोड गंगाखेड यांचे लक्षवेधी भाषण अधिवेशनामध्ये चर्चेचा विषय राहिला. बंजारा समाजातील महिलांची वास्तविक परिस्थितीचा उलगडा तिने आपल्या भाषणातून केले.

रजत महोत्सवी कार्यक्रम राज्यस्तरीय अधिवेशन बंजारा समाजाला दिशा देणारे - राजेश राठोड, आमदार

रजत महोत्सवी कार्यक्रम राज्यस्तरीय अधिवेशन बंजारा समाजाला दिशा देणारे - राजेश राठोड, आमदार

या सत्राचे आसोला नाईक येथील महिला व पुरुष लेंगी मंडळ यांनी लेंगी नृत्य साजरा करून सर्वांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण केला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील मुलीने सांस्कृतिक गाण्यावर नृत्य सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.बंजारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन पहिल्या दिवशीय  रजत महोत्सवी व राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमांचा समारोह करण्यात आले.

रजत महोत्सवी कार्यक्रम व अधिवेशनाचा दुसऱ्या दिवस (3 फेब्रुवारी)

सत्र सातवे

मा‌. श्री. अशोक भाऊ राठोड राष्ट्रीय महासचिव यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजातील अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना असल्यामुळे आपली सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगती होऊ शकते का ? नाही उत्तर असेल तर एकत्रित येण्यासाठी आपल्याला काय भूमिका घ्यावी लागेल. यासंदर्भात अधिवेशनात सविस्तर चर्चा विनिमय करण्यात आली. या सत्राचे प्रास्ताविक प्रदेश महासचिव प्रा.मा. किशन पवार सर यांनी केले .बंजारा विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी, संस्था संघटना प्रमुखांनी सहभाग घेऊन या विषयावर खल करण्यात आले. याप्रसंगी मा. राजपालसिंग राठोड (संयोजक पांढरे वादळ), मा.कांतीलाल नायक (अध्यक्ष अ.भा‌‌.बंजारा सेना) मा‌.रविकांत राठोड अध्यक्ष (राष्ट्रीय बंजारा ब्रिगेड), मा‌. आत्माराम जाधव (राष्ट्रीय बंजारा टायगर्स), मा.विलास रामावत राष्ट्रीय अध्यक्ष (गोर शिकवाडी), मा डॉ. बी डी चव्हाण (NSDA) बंजारा समाजातील अनेक सामाजिक संस्था संघटनांच्या प्रमुखांनी या सत्रामध्ये सहभाग घेतला होता‌.  बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी सामाजिक संस्था , संघटना एकत्रित येऊन समाजासाठी काम करणे गरजेचे आहे. जवळपास सर्वांनीच अशी भुमिका माडली.

रजत महोत्सवी कार्यक्रम राज्यस्तरीय अधिवेशन बंजारा समाजाला दिशा देणारे - राजेश राठोड, आमदार

आठवे व सत्र नववे

मा. डॉ‌.प्रा. शाम मुडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सत्र संपन्न झाले. या सत्राचे  संचालन मा.आत्माराम चव्हाण (संघटन सचिव) यांनी केले. स्वाभिमानी व स्वावलंबी समाज निर्माण होण्यासाठी बुद्धिजीवी वर्ग अर्थात कर्मचारी वर्गांना पे बॅक टू सोसायटी अर्थात आर्थिक सहयोग देणे का जरुरीची आहे ?या विषयावर बंजारा समाजातील कर्मचारी समाज बांधव बुद्धिजीवी वर्ग उपस्थित होता. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करायला हव असं वाटत असेल तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण आर्थिक सहयोग देणे हे महत्त्वाचे आहे. जवळपास उपस्थित  सर्व मान्यवरांनी या मताला दुजोरा दिला. तर  मा. श्याम मुडे सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामधून सर्व श्रोत्यांची कान उघडणी करून समाजाला पे बॅक टू सोसायटीचे विविध प्रकार लक्षात आणून दिले‌. समाजातील वास्तविकते संदर्भात बोलताना त्यांनी समाजासाठी पे बॅक टू सोसायटी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून बुद्धिजीवी वर्गांना आवाहन केले.


सत्र दहावे

या सत्राचे अध्यक्ष भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दिगंबर भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. बंजारा समाज संपुर्ण भारतात वास्तव्यास आहे. विविध राज्यात मध्ये विविध जातीमध्ये ते विभागलेले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यासाठी काय करावे लागेल कोणती रणनीती आखावी लागेल या संदर्भात सविस्तर चर्चा विनिमय करण्यात आली. तसेच खुल्या सत्रामध्ये मा. श्री‌. राजेश भाऊ राठोड आमदार महाराष्ट्र राज्य ‌सह अनेक नेतेगण मंडळी उपस्थित होती‌‌. या विषयावर सविस्तर चर्चा विनिमय करण्यात आली. सन्माननीय आमदार राजेश भाऊ राठोड यांनी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेद्वारे आयोजित रजत महोत्सवी कार्यक्रम व राज्यस्तरीय अधिवेशन खरोखरच बंजारा समाजासोबतच इतर समाजामध्ये आदर्श निर्माण करणारे आहे. असं मत भाषणामध्ये त्यांनी व्यक्त केले.


भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेने एकुण दहा सत्रांमध्ये दोन दिवसीय रजत महोत्सव व राज्यस्तरीय अधिवेशनात बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्ता, कवी, राजकीय नेते मंडळी महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील कर्मचारी समाज बांधव यांना एका विचार मंचावर आणून उल्लेखनीय आणि उत्तम कार्य  केल्याने. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. हा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहे. व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेले त्या सर्वांबद्दल  मा. डॉ.व्यंकटेश भाऊ राठोड यांनी प्रदेश अध्यक्ष या नात्याने सर्वांन बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर सन्माननीय दिगंबर भाऊ राठोड यांनी समारोपीय अध्यक्षीय भाषणामध्ये मत व्यक्त करताना बोलले कि, गेल्या पंचवीस वर्षापासून समाजाकडून एक रुपय न घेता कर्मचारी वर्गाच्या सहकाऱ्यांनी सामाजिक समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था नेहमी प्रयत्न करत आहे व करत राहील. परंतु हे सर्व तेव्हाच शक्य होऊ शकेल जेव्हा सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जास्तीत जास्त संख्येने कर्मचारी समाज बांधवांनी संस्थे मध्ये आर्थिक योगदान दिल्यावर व तुम्हा सर्वांचे सहकार्य मिळाल्यावर..! असं भावनिक आव्हान तमाम महाराष्ट्र राज्यातील, कर्मचारी समाज बांधव, बुद्धिजीवी वर्ग यांना करण्यात आले.

अधिवेशनात  विविध ठराव मांडून व मंजुरी मिळवून अध्यक्षांच्या सहमतीने भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था रजत महोत्सव व राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post