जामनेर (पिंपळगांव कमानी) : पिंपळगांव कमानी येथे वार्ड क्रमांक २ मध्ये गटारीतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व पाण्याचा व्हाॕल्व जोडला आहे त्यामुळे या वार्डमधील नागरिकांना रोज घाण पाणी मिळत असल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, ग्रामपंचायत प्रशासनचे मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष असून हे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने या वार्डमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करावे आणि वार्डमधील सर्व गटारी व पाण्याची पाईपलाईन आणि व्हाॕल्व त्वरित दुरुस्त करावे अन्यथा सर्व नागरिक ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालय, जि.प.कार्यालय आणि जळगांव जिल्हाधिकारी यांना याबाबतीत सविस्तर निवेदन देऊन ग्रामपंचायत प्रशासन विरोधात आंदोलन करेल असे निवेदन जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,संस्थेचे विद्यमान संचालक तथा उपसरपंच-संदिपभाऊ राठोड, ग्रामपंचायत सदस्या-सौ.अनुसया चव्हाण, संस्थेचे संचालक, प्रविणभाऊ चव्हाण, भारत चव्हाण, बबलू राठोड यांच्यासह सर्व नागरिकांनी कळविले आहे.