पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची जळगाव जिल्हा पोलीस दला तर्फे रात्रीच्या राहण्याची व्यवस्था

पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची जळगाव जिल्हा पोलीस दला तर्फे रात्रीच्या राहण्याची व्यवस्था

जळगाव : राज्यात पोलीस दलात विवीध संवर्गातील पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. जळगाव पोलीस दलात १३७ पोलीस शिपाई पदाकरीता दिनांक:- १९/०६/२०२४ पासुन भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सुरु झालेली आहे.

जळगाव शहरात पोलीस भरती करीता शाररिक व मैदानी चाचणीस बाहेरगावाहुन येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानाजवळील मंगलम हॉल व मल्टीपर्पज येथे मोफत रात्रीची राहण्याची व्यवस्था केलेली आहे.

पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची जळगाव जिल्हा पोलीस दला तर्फे रात्रीच्या राहण्याची व्यवस्था

तरी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी पोलीस भरती करीता बाहेरगावाहुन येणा-या उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानाजवळील मंगलम हॉल व मल्टीपर्पज हॉल येथे केलेल्या रात्रीच्या राहण्याच्या व्यवस्थेचा लाभ घ्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post