ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित,आनंद विश्व गुरुकुल,ठाणे आयोजित, भातलावणी व छोटा कमांडो प्रशिक्षण ,शनिवार,दि.१३ जुलै २०२४ व रविवार, दि.१४ जुलै २०२४ या दिवशी मु.सावरोली(सोगाव),शहापूर या ठिकाणी आयोजित केले होते.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, माननीय श्री.विलास ठुसे सर व सचिव,माननीय डॉ. श्री. प्रदीप ढवळ सर यांची प्रेरणा मोलाची ठरली.शाळेच्या मुख्याध्यापिका, डॉ.सौ. वैदेही कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता-४ थी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या समनवयिका सौ.स्वराली माने,व्यक्तिमत्त्व विकास विभागाच्या,समनवयिका,सौ.मयुरा गुप्ते मॅडम,शिक्षक,आर्मी विंग्स संस्थेचे प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मुलांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन भातलावणी करण्याचा अनुभव घेतला.रिमझिम पावसात भिजण्याचा,नदी,छोटे-मोठे ओढे,सर्वदूर पसरलेली हिरवळ पाहण्याचाही आंनद घेतला.तसेच एकत्रितपणे स्वयंपाक बनवण्याचा अनुभव घेतला.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू जाणवलं.
उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुलांना आर्मी विंग्स संस्थेच्या प्रशिक्षकांनी,धनुर्विद्या,रायफल शुटिंग,अडथळा शर्यत आणि वेगवेगळे शारीरिक प्रशिक्षण दिले. ग्रामीण जीवन जवळून पाहता आलं. तसेच गावातील राईसमिल दाखवण्यात आली व त्याविषयी माहिती देण्यात आली.
संस्थेच्या सर्व पदाधिकारी ,शाळेच्या मुख्याध्यापिका,समनवयिका,सर्व शिक्षक,प्रशिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा दोन दिवसीय उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.