मुंबई विद्यापीठाचा ५७ वा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव :आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय ठाणे येथे जल्लोशात साजरा

 मुंबई विद्यापीठाचा ५७ वा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव :आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय ठाणे येथे जल्लोशात साजरा


ठाणे : दिनांक १८ ऑगस्ट २०२४ – मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या ५७ व्या अंतर्विदागी युवक महोत्सवाचा चौथा ठाणे मध्यवर्ती क्षेत्र साहित्यिक आणि ललित कला स्पर्धा शारदा एज्युकेशन सोसायटी, आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय येथे डॉ. सुनील पाटिल, निर्देशक, विद्यार्थी विकास विभाग, (मुंबई विद्यापीठ) यांच्या अध्यक्षते ख़ाली दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक डॉ. रुपेश ध्रुवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेत ४० हून अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मुंबई विद्यापीठाचा ५७ वा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव :आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय ठाणे येथे जल्लोशात साजरा

या दिवसभर चाललेल्या स्पर्धेत ६ साहित्यिक आणि ७ ललित कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शारदा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संस्थेच्या विश्वस्त व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, विभागीय समन्वयक डॉ. अर्चना प्रभुदेसाई, विभागीय सह-समन्वयक आकाश कांबळे आणि मुख्य अतिथी प्रा. मंदार टिल्लू यांच्या शुभहस्ते झाले. संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य शिक्षक समन्वयक प्रा. विनायक जोशी, प्रा. सचिन आंबेगावकर इतर प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचा सूत्रधार प्रा. भक्ती पावसकर यांनी युवक महोत्सवाचे महत्त्व विशद करत त्याचे कलाकार निर्माण करण्यातील योगदानाचा उल्लेख केला. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्य अतिथी प्रा. मंदार टील्लू यांनी विद्यार्थ्यांना विजयापेक्षा सहभागाचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक संयोजक निलेश सावे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या कलात्मक कामगिरीचे कौतुक केले.

कार्यक्रमाचा शेवटी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. रुपेश ध्रुवंशी यांनी २८ विजेत्या विद्यार्थ्यांना विभागीय फेरीत पात्र ठरल्याचे पत्र देऊन पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. शारदा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी विजेत्यांना अभिनंदन करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post