सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी.
पुणे : महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत. तसेच याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ आज जगामध्ये हेच मानवी मूल्य रुजवण्याचे काम करत आहेत आणि तेच काम या दाम्पत्यांनी त्याकाळी केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे (महाराष्ट्र राज्य) , कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
समाजाला जातीभेद, वंशभेद, स्त्री पुरुष भेद या सगळ्या भेदाभेदांची टोचणी वाटण पुरेसे नसते तर त्यासाठी काहीतरी कृती करावी लागते असा संदेश सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी आयुष्भर दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने तशी कृतिशीलता आपल्यात निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या कार्यांना जसा सर्व जाती.
Tags
पुणे