डोंबिवली : शिवजयंतीचा सोहळा हा प्रत्येक शिवभक्तासाठी खास असतो. महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आज राज्यासह जगभरात साजरी करण्यात येत असून आज महावितरण डोंबिवली, उपविभाग - ४ येथे देखील मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने महिला व पुरुष कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्रिवार मानवंदना देण्यात आली. तसेच कार्यालयातील कर्मचारी यांनी महाराजांबद्दल असलेले त्यांचे मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात १८६९ साली करण्यात आली. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली असे सांगितले जाते. नंतर १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव म्हणून सुरू केला. जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता.
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत. त्यानुसार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस अर्थात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
आज महावितरण डोंबिवली, उपविभाग - ४ येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करतांना सहाय्यक अभियंता जयेश बेंडारी, मानव संसाधन विभागाचे धनंजय दिवेकर, महावितरण कार्यालयातील कर्मचारी वर्ग सचिन राऊत, सागर ठाकूर, मनोहर दिघे, वैभव गोडशेलवार, मनोज कोळी, आदित्य पाटील, विनोद सोनवणे, अमोल दूड्डे, गजानन मारकवाल, वृषभ वैराडे, सतिष सानप, निलेश, मनिष जाधव, मनोज फिरके, नवनाथ दिवाणे, मनोहर दिघे, अनिता माचे, रुणाली पेवेकर, पुनम खुरकुटे, माधवी जाधव, वौशाली, स्वप्नील, आदित्य, भुमेंद्र पटले, संदीप घोरपडे, नरेंद्र घोडविंदे, विनोद वानखडे, श्रीकांत भिंगारदिवे, भूषण ढोकणे इ. कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत शिव जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.