ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय व आनंद विश्व गुरुकुल इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना तर्फे "रक्तदान शिबिर" आयोजित करण्यात आले.
या शिबिरात शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. डॉ. प्रदीप ढवळ सर, आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते मॅडम, आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर मॅडम, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ऍडव्होकेट सुयश प्रधान सर, आनंद विश्व गुरुकुल इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्या मा. मयुरी पेंडसे मॅडम, प्री प्रायमरी विभागाच्या प्राचार्या डॉ. वैदेही कोळंबकर मॅडम, कौशल्य विभागाच्या प्रमुख मा. मयुरा गुप्ते मॅडम, कै. वामनराव ओक रक्तपेढी प्रमुख मा. सुरेंद्र बेलवलकर सर, प्राध्यापक समन्वयक मा. विनायक जोशी सर, परीक्षा विभाग प्रमुख मा. सचिन आंबेगावकर सर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी संजना भाबल, सहायक कार्यक्रम अधिकारी अजय ब्राह्मणे, सहायक कार्यक्रम अधिकारी मनिषा सराफ तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. शिबिराचे आयोजन कै. वामनराव ओक रक्तपेढी, ठाणे यांनी केले होते. शिबिराची सुरुवात दुपारी 4 वाजता झाली.
या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी, महाविद्यालयाच्या इतर तरुण विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा उत्साहाने सहभाग घेतला आणि 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात रक्तदान करण्याची सुविधा पुरवण्यात आली होती. रक्तदानासाठी लागणारी सर्व उपकरणे आणि प्रक्रिया योग्य प्रकारे ठेवली गेली होती.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी संजना भाबल यांनी सूत्रसंचालन केले व आनंद विश्व गुरुकुल व आनंद विश्व गुरुकुल इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्या मा. मयुरी पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, "रक्तदान हा एक अत्यंत महत्वाचा आणि जीवनदान देणारा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे अनेक जणांची जीवनाची संजीवनी मिळवण्यास मदत होईल."
रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले गेले. तसेच रक्तदानाचे महत्त्व व त्याच्या फायद्यांवर विशेष माहिती देणारे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते यांनी रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यात देखील असे शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रक्तदान करा, जीवन वाचा !