भिवंडी तालुक्यात असलेले लाखिवली गावात यशस्वीपणे हे शिबीर पार पडले.
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील लाखिवली गावात श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय व कायदेशीर सहाय्य केंद्रातर्फे शुक्रवार व शनिवार रोजी मोफत दोन दिवसीय कायदेविषयक सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विधी महाविद्यालयातील प्राचार्या ॲड. सौ डॉ. गायत्री पाटील, सहाय्यक प्राध्यापक ॲड. अंबर जोशी, ॲड. डॉ. स्वप्निल पाटील, ॲड. विठ्ठल दिवेकर, ॲड. सायली ठाकूर, ॲड. वीणा कोंडा, प्रसन्न मदन यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर नोंदवला.
जनतेमध्ये कायद्याबाबत आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून विधार्थ्यांकडून पथनाट्यही सादर करण्यात आले. तसेच गावातील लोकांच्या कायदेविषयक ज्ञानाचे सर्वेक्षण करण्यात आले. सोबतच गावकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या अनेक विधी विषयक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न देखील केला गेला.
कायदेशीर तज्ज्ञांच्या टीमने मालमत्तेचे हक्क, कौटुंबिक बाबी आणि इतर अनेक मुद्द्यांवर कायदेशीर सल्ला दिला. प्रत्येक उपस्थित व्यक्तीला त्यांच्या विशिष्ट कायदेशीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनुकूल मार्गदर्शन मिळाले. गावातील ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे विशेष असे कौतुक देखील करण्यात आले.
तसेच या दोन दिवसीय कायदेशीर शिबिरात सहभागी झालेल्या विधी विद्यार्थ्यांची राहण्याची तसेच जेवणाची सोय सहाय्यक प्राध्यापक ॲड. विठ्ठल दिवेकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी छान अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळेत केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण टीमने विशेष असे प्रयत्न केले.
कायदेशीर आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी व ज्ञान प्रदान करणे - ॲड. सौ डॉ. गायत्री पाटील, प्राचार्या
विविध कायदेशीर विषयांबाबत समुपदेशन मोफत देण्यात आली, ज्यामुळे विविध कायदेशीर बाबींवर स्पष्टता आणि समर्थन मिळाले. या शिबिराचे उद्देश हे कायदेशीर प्रक्रियांचे गूढ उलगडणे आणि उपस्थितांना त्यांच्या कायदेशीर आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्रदान करणे हा आहे.
ग्रामीण भागात कायदेविषयक ज्ञानाचा प्रसार करत राहू - ॲड. विठ्ठल दिवेकर
कायदेशीर सहाय्य्य शिबिराचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक ॲड. विठ्ठल दिवेकर यांनी ग्रामीण भागात कायदेविषयक ज्ञानाचा प्रसार करत राहू असे आश्वासन दिले.
माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांचा चालू प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा - ॲड. अंबर जोशी
कायदेशीर हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करण्याच्या श्री. इंद्रापल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालतील माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांचा चालू प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे, व कायदेविषयक अश्या उपक्रमांना प्रत्येक गावात प्रोत्साहन दिले पाहिजे असा सल्ला सहाय्यक प्राध्यापक ॲड. अंबर जोशी यांनी दिला.
कायदेशीर मदत आणि जागरूकता शिबिर हे केवळ एक कार्यक्रम नाही; तर ते पुढील पिढीसाठी एक उज्ज्वल, अधिक माहितीपूर्ण भविष्य घडवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. समुदायाला त्यांच्या कायदेशीर हक्कांचे ज्ञान देऊन आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्यायाचे पथदर्शी होण्यासाठी तयार करून, आम्ही एक सुरक्षित आणि अधिक न्याय समाज निर्माण करत आहोत.
कायदेशीर जागरूकतेद्वारे समुदायांना सक्षम बनवण्याचे आमचे ध्येय - ॲड. डॉ. स्वप्निल पाटील, सहाय्यक प्राध्यापक
कायदेविषयक अशा उपक्रमांद्वारे, आम्ही न्याय, शिक्षण आणि सामुदायिक सेवेप्रती आमची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. कायदेशीर जागरूकतेद्वारे समुदायांना सक्षम बनवण्याचे आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी भविष्यात असे आणखी कार्यक्रम आयोजित करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तसेच ॲड. डॉ. स्वप्निल पाटील यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना छान असे मार्गदर्शन केले.
कायदेशीर शिक्षणाद्वारे समुदायांना सक्षम बनवण्याच्या उद्देश - ॲड. सायली ठाकूर, सहाय्यक प्राध्यापक
यावेळी ॲड. सायली ठाकूर यांनी असे म्हटले की, कायदेशीर शिक्षणाद्वारे समुदायांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने या कायदेशीर मदत आणि जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.