महाराष्ट्र दिनी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध

महाराष्ट्र दिनी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाणक्रियांना प्रतिबंध असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी काढले आहे.

या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्याकरिता वरील परिसरातील अवांछित कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post