गणतंत्र दिवस Daysaan Foundation च्या वतीने उत्साहात साजरा

गणतंत्र दिवस Daysaan Foundation च्या वतीने उत्साहात साजरा


ठाणे : Daysaan Group of Companies आणि Daysaan Foundation च्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2025 रोजी गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात Daysaan Group चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अतुल तारासिंग राठोड, RNext Hotel चे CEO रघुनाथ शेट्टी, Daysaan Foundation च्या वैशाली अतुल राठोड, तसेच Daysaan Group च्या ब्रँड अॅम्बेसेडर्स नीतू आणि नेमू यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाला साज चढवला. Daysaan Group आणि Foundation च्या सर्व सदस्यांनी आपल्या देशप्रेमाची भावना व्यक्त करत कार्यक्रम यशस्वी केला.

डॉ. अतुल राठोड यांचे प्रेरणादायी विचार:

आपल्या भाषणात डॉ. अतुल राठोड यांनी देशाच्या 75 वर्षांच्या प्रगतीबद्दल चर्चा करत शैक्षणिक आणि व्यावसायिक परिस्थितीतील उणीवांवर प्रकाश टाकला. त्यांनी तरुणांना नोकरीपेक्षा उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले आणि भ्रष्टाचाराच्या कर्करोगावर कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतींचा आदर्श घेऊन कठोर कायदे तयार करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या समस्यांवरही चिंता व्यक्त केली.


कार्यक्रमाची सांगता:

Daysaan Foundation च्या वैशाली राठोड यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करत सर्वांचे आभार मानले. नीतू व नेमू यांनी देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. Daysaan Group व Foundation च्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत गणतंत्र दिनाला एका आगळ्यावेगळ्या उत्साहाने साजरे केले.



Post a Comment

Previous Post Next Post