भिवंडी - शाळा महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणी मिळण्याची सोय होते. तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला होता. राज्यभरात 1 ते 15 जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वाचनाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला ग्रंथालयांशी जोडणे आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करणे आहे. यामुळे वाचकांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न झालेले आहेत.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या संकल्पनेनुसार श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने 26 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गायत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ याविषयी विविध कार्यक्रम आयोजित करुन महाविद्यालयातील ग्रंथालयाची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच ग्रंथपाल अलका मिलिंद ढगे यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ग्रंथ दिंडी, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ व विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवाद, ध्वजवंदन आणि बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमात सहभाग घेऊन उपस्थिती दाखवलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुरस्कारासाठी निवड केलेले विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करुन गौरविण्यात आले.
● पुरस्कार प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. ●
★ बेस्ट लायब्ररी रिविव अवॉर्ड ★
- सतिष एस राठोड, पत्रकार - F.Y LL.B
- विशाल राठोड - T.Y LL.B
★ बुक रिडींग अँड बुक रिविव विनर (मराठी) ★
- दिप्ती काटे - BA LLB
- अभिषेक शिंदे - F.Y LL.B
- लवेश वारघडे - T.Y LL.B
★ बुक रिडींग अँड बुक रिविव विनर (इंग्लिश) ★
- शैलेंद्र विश्वकर्मा - T.Y LL.B
- प्राची दूधसागर - BA LLB
- मुकेश यादव - T.Y LL.B
★ बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्ड ★
- श्रद्धा कांबळे - T.Y LL.B
- आरती राठोड - T.Y LL.B
- प्रिती पंडित - T.Y LL.B
- लवेश वारघडे - T.Y LL.B
★ लायब्ररी रिविव अवॉर्ड ★
- प्रिती पंडित - T.Y LL.B
- लवेश वारघडे - T.Y LL.B
- श्रद्धा कांबळे - T.Y LL.B
- दिप्ती काटे - LLB 5th
- उषा मुंडे - LLB 5th
★ बेस्ट न्यूजपेपर यूजर अवॉर्ड ★
- सादिक मोहम्मद